पुणे : पोलीस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा मागे घेण्यात यावा, या मागणीसाठी प्रियकराने प्रेयसीचा नग्न फोटो व्हाट्सअप स्टेटसला ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 1 डिसेंबर रोजी हा प्रकार घडला.
कोंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 32 वर्षीय तरुणीने या प्रकरणी तक्रार दिली आहे. देवेंद्र धरमचंद फुलफगर (रा. शिरूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांच्यात मागील तीन वर्षापासून प्रेम संबंध आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वी फिर्यादी तरुणीने तक्रार दिल्यानंतर आरोपी विरोधात मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात 354 (अ) (ड) 500 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा गुन्हा मागे घ्यावा यासाठी आरोपीने 1 डिसेंबर रोजी स्वतःच्या व्हाट्सअप स्टेटसवर फिर्यादी यांचा नग्न अवस्थेतील फोटो ठेवला. त्यानंतर ‘ये तो अभी शुरुवात है’ असे म्हणत फिर्यादी यांच्यावर दबाव टाकला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.