कौटुंबिक न्यायालयातच पतीने एका बुक्कीत पत्नीचा दात पाडला

0

शिवाजीनगर : पुण्यातील कौटुंबिक न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच घटस्फोटाला नकार दिल्याने पती-पत्नी हाणामारी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यावेळी पतीने पत्नीच्या तोंडावर बुक्की मारून तिचा दात पडला. शिवाजीनगर येथील कौटुंबिक न्यायालयात घटना घडली.

पोलिसांनी या प्रकरणी सचिन विकास पवार (वय ३४) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सोलापूर येथे राहणाऱ्या पत्नीने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी दोघेही पती-पत्नी आहे. काही कारणास्तव त्यांच्यात पटत नसल्यामुळे ते दोघेही सध्या वेगळे राहतात. शिवाजीनगर येथील कौटुंबिक न्यायालयात ते समुपदेशनासाठी आले होते.

दरम्यान समुपदेशन सुरू असतानाच पतीच्या विनंती प्रमाणे घटस्फोट देण्यास पत्नीने नकार दिला. त्यानंतर हे दोघेही बाहेर आले. बाहेर आल्यानंतर सचिन पवार यांनी पत्नीचा तोंडावर जोराचा ठोसा मारला. यामध्ये फिर्यादी यांचा एक दात पडला आणि त्या जखमी झाल्या आहेत.

शिवाजीनगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.