गेल्या 24 तासात पुण्यात 4100 तर पिंपरी चिंचवड मध्ये 2100 पेक्षा जास्त नवीन रुग्ण

0

पुणे : राज्यात कोरोनाची संख्या झपाट्याने वाढत आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात दररोज रुग्ण संख्येत वाढ होत आहे. गेली 24 तासात पुणे शहरात 4 हजार 103 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 49 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पिंपरी चिंचवड शहरात ल 2113 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 17 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

पुणे शहरामध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असताना मृतांची संख्या वाढत असल्याने चिंता वाढली आहे. पुणे शहरात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 73 हजार 446 वर पोहचली आहे. पुणे शहरात दिवसभरात 49 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 35 रुग्ण शहरातील आहेत तर 14 रुग्ण शहराबाहेरील आहेत. आतापर्यंत 5 हजार 337 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान 2 हजार 077 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 32 हजार 260 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज (गुरुवार) दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 20 हजार 681 स्वॅब तपासणी करण्यात आली. शहरात सक्रिय रुग्ण संख्या 35 हजार 849 इतकी आहे. त्यापैकी 825 रुग्ण गंभीर आहेत, अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 5 लाख 34 हजार 411 रुग्णांपैकी 4 लाख 62 हजार 697 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण 61 हजार 832 आहे. कोरोनाबाधित एकूण 9 हजार 882 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.85 टक्के इतके आहे. तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 86.58 टक्के आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात शहरात 2113 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 42 हजार 251 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 1161 रुग्णांची कोरोनाची दुसरी टेस्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्य़ंत 1 लाख 21 हजार 483 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरामध्ये सध्या 3360 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शहरामध्ये रुग्णसंख्या वाढत असताना मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. आज दिवसभरात 17 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये 15 रुग्ण शहरातील आहेत. तर 2 रुग्ण हद्दीबाहेरील आहेत. आजपर्यंत शहरामध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 2857 इतकी झाली आहे. यामध्ये शहरातील 2018 तर हद्दीबाहेरील 839 रुग्णांचा समावेश आहे. आज मृत्यू झालेले रुग्ण पिंपरी, वाल्हेकरवाडी, चिंचवड, तळवडे, निगडी, दिघी, कासारवाडी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, चिखली, काळेवाडी, चाकण येथील रहिवाशी आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.