क्रीडा संघटना बैठकीत खेळातील येणाऱ्या समस्या बाबतीत विविध उपाय व योजनाची आखणी

0
पिंपरी :  संत भूमी,औद्योगिक नगरी बरोबरच क्रीडानगरी  म्हणून देशात शहराची ओळख निर्माण करायची आहे त्यामुळे क्रीडा क्षेत्रासाठी  निधी कमी पडू देणार नाही असे मत क्रिडा सभापती प्रा उत्तम केंदळे यांनी व्यक्त केले.
आमदार महेशदादा लांडगे यांच्या सूचने नुसार शहरातील विविध क्रिडा संघटनाची बैठक नुकतीच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील कै मधुकर पवळे सभागृहात आयोजित केली होती यावेळी ते बोलत होते.
यावेळी क्रीडा समिती सदस्य शर्मिला बाबर,क्रीडा अधिकारी रज्जाक पानसरे,जुनि. टेक्नि. असि.गजेंद्र नागपुरे,क्रीडा पर्यवेक्षक  अनिता केदारी,क्रीडा पर्यवेक्षक जयश्री साळवे,क्रीडा पर्यवेक्षक रंगराब पां कारंडे,क्रीडा पर्यवेक्षक महाकाळ आत्माराम किसन,क्रीडा पर्यवेक्षक विश्वास गेंगजे, दत्तात्रय झिंजुर्डे सहकार्यवाह पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन आंतरराष्ट्रीय कबड्डी पंच, आटवे बी जी, ॲथलेटिक्स संघटनेचे रामदास कुदळे,शेखर कुदळे,कराटे संघटनेचे खजिनदार अविनाश चंदनशिवे,कराटे संघटनेचे शहराध्यक्ष रवींद्र सूर्यवंशी,योग संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनोज काळे,बॉक्सिंग संघटनेचे प्रकाश काकडे,मनोहर इंगवले,डिटट्रीक बॅडमिंटन संघटनेचे सोनाजी गावडे/राजीव बाग,सिकई असो चे इकबाल शेख, किक बॉक्सिंग असोसिएशन चे संतोष म्हात्रे, आर्चरी असोसिएशन शहर सचिव सोनल बुंदेले इत्यादी उपस्थीत होते.
विविध क्रिडा संघटनांच्या प्रतिनिधींनी खेळाविषयी असलेल्या समस्या यावेळी मांडल्या.यामध्ये धनुर्विद्या या खेळासाठी गेली दहा वर्षे झाले शहरात सराव करण्यासाठी जागा उपलब्ध होत नाही. ही समस्या क्रीडा संघटनेच्या प्रतिनिधींनी मांडली असता केंदळे यांनी यासंदर्भात चर्चा करून लवकरात लवकर रोड पासून जागा जवळ उपलब्ध करून देऊन विषय मार्गी लावण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
शेखर कुदळे यांनी अॅथलेटिक्स या खेळासाठी सुविधा आहेत पण मैदान नाही.इंद्रायणीनगर येथील असलेले ग्राउंड सर्वांसाठी खुले करण्यात यावे.महिन्याला भाडे  आकारल्या पेक्षा वार्षिक भाडे आकारावे.ऑफलाइन बुकिंग साठी दूरवर जावे लागते त्यामुळे ऑनलाईन बुकिंग ची हि व्यवस्था व्हावी.इंद्रायणी नगर येथील मैदानातील ट्रॅक नव्याने तयार करावा.खेळा मध्ये बदल झालेले आहेत म्हणून नवीन साहित्यही उपलब्ध करून देण्यात यावे. या मागण्या केल्या असता याला केंदळे यांनी सकारात्मकता दर्शवली.
बॉक्सिंगसाठी शहरात अपुरे मैदाने आहेत अजूनही मैदाने उपलब्ध व्हावेत. मैदाने आहेत त्या ठिकाणी अजुन सुविधा वाढवाव्यात.अनेक दिवसापासून शहरात बॉक्सिंगच्या स्पर्धा झालेल्या नाही त्यामुळे राष्ट्रीय स्तरावरची स्पर्धा घ्यावी.बॉक्सिंगसाठी रिंग तयार करावी. यावर बोलताना सभापती केंदळे ह म्हणाले की, आयुक्त राजेश पाटील हे स्वतः एक खेळाडू असल्यामुळे याकडे ते लक्ष देतील त्यामुळे या सर्व समस्या दूर होतील व सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील.
कबड्डीचे प्रशिक्षक दत्ता झिंजुर्डे यावेळी म्हणाले की,मी पहिला क्रीडा सभापती बघतोय की क्रिडा संघटना सोबत आपुलकीने चर्चा करत आहेत.आपले शहर हे कबड्डीची पंढरी आहे.माझ्या नंतर पंच घडावेत म्हणून मी यानंतर पंच म्हणून काम करणार नाही.सरावा प्रमाणेच स्पर्धा घेतल्यामुळे खेळाडू घडतात. त्यामुळे स्पर्धा घेणे अत्यंत आवश्यक आहे.शहरात कबड्डीची राज्यस्तरीय स्पर्धा आपण घ्यावी अशी मागणी केली असता सभापती यांनी स्पर्धेच्या तयारीला आज पासूनच लागलो आहे अशी माहिती दिली व येणाऱ्या काळात नक्कीच स्पर्धा होईल असे आश्वासन दिले.
सर्व क्रिडा संघटनेच्या प्रतिनिधींच्या  समस्या ऐकल्यानंतर सभापती प्राध्यापक उत्तम केंदळे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका खेलरत्न पुरस्काराचे धोरण तयार होत आहे यामध्ये स्थानिक खेळाडूंना प्राधान्य देण्यात येईल.दोन वर्षात ज्या खेळाडूंचे सत्कार राहिलेले आहेत  त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे त्यामुळे त्यांची लवकरात लवकर नावे देण्यात यावी.खेळाडूंना राहण्यासाठी हॉस्टेलची मागणी केली असता मगर स्टेडियम येथे तीन मजली हॉस्टेल तयार होत आहे.विविध खेळांसाठी हॉल बांधण्याचे नियोजनही करणार आहे.महानगरपालिकेच्या वतीने कबड्डी राष्ट्रीय स्पर्धा  होणार आहे.धनुर्विद्या खेळासाठी दत्तक खेळाडू अंतर्गत मैदान देण्यात येणार आहॆ अशी माहिती क्रिडा संघटनांना दिली.
 स्पर्धा घेण्यासाठी टेक्निकल  परवानग्या घ्याव्यात व स्पर्धांच्या पूर्वतयारीला लागावे अशा सूचनाही अधिकाऱ्यांना केंदळे यांनी दिल्या.
खेळाडूसाठी विमा योजना व फिटनेस सेंटरसाठी आग्रही
विविध खेळामध्ये खेळाडू खेळताना दुखापत होईल हे सांगता येत नाही. बहुतांश खेळाडू हे गरिबीतून आलेले असतात त्यामुळे त्यांच्याकडे आर्थिक चणचण असते.भविष्यात खेळाडूंना अडचणीचा सामना करावा लागू नये यासाठी मी खेळाडूंना विमा योजना अमलात  आणण्यासाठी व खेळाडू चे आरोग्य तंदुरुस्त राहण्यासाठी, स्पर्धेतील मैदानात खेळण्यासाठी उतरण्यापूर्वी फिटनेस चाचणी होऊन तो यशस्वी होऊ शकतो का नाही हे तपासण्यासाठी फिटनेस सेंटर करण्यासाठी आग्रही असणारा असल्याची भूमिका सभापती प्राध्यापक उत्तम केंदळे यांनी मांडली.
Leave A Reply

Your email address will not be published.