पिंपरी : तळेगाव दाभाडे येथे जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची भरदिवसा गोळ्या घालून आणिकोयत्याने वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना ताजी आहे. आज (सोमवार) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास चिखली चौकातउभ्या असलेल्या युवकावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.
कृष्णा उर्फ सोन्या हरिभाऊ तापकीर (20, रा. मोई) याच्यावर गोळीबार झाला असून त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला असून त्याचीप्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. पुर्ववैमनस्यातून हा गोळीबार झाला असल्याची शक्यता पोलिसांकडूनवर्तविली जात आहे. भरदिवसा चिखली चौकात घडलेल्या घटनेमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मारेकर्यांनी गोळीबार करून पळ काढला असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
सोन्यावर त्याचे मित्र सौरभ उर्फ सोन्या पानसरे आणि सिद्धार्थ कांबळे या दोघांनी गोळ्या झाडल्याचे तपासात समोर आले आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी भेट दिली असून चिखली पोलिस घटनेचा अधिक तपास करीत आहेत. गोळीबाराचे नेमकेकारण अद्यापही समोर आलेले नाही. परिसरातील CCTV फुटेज तपासण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.