गुन्हे शाखा युनिट १ येथील पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांनी युनिट १ हद्दीत रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करीत होते. त्यावेळी बाळु कोकोटे व प्रमोद गर्जे यांना एक इसम चोरीचा मोबाईल घेऊन तो विक्री करण्यासाठी लांडेवाडी चौकामध्ये येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. सदर माहितीबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ.अमरनाथ वाघमोडे यांना कळविली.
त्यांच्या सुचनेप्रमाणे लांडेवाडी चौक, भोसरी येथे सापळा रचुन मोठया शिताफिने संशयीत इसमास ताब्यात घेतले. अजय रिका पवार (१९, रा. आपले घर जकात नाका , खराडी , पुणे) याची झडती घेतली असता त्याच्या जवळ मोबाईल मिळाला आहे. मोबाईल बाबत समाधानकारक उत्तर दिले नाही. त्याची सखोल चौकशी केली असता सदर मोबाईल त्याने दोन साथीदाराच्या मदतीने हिंजवडी येथुन चोरी केल्याचे सांगितले. पोलिसांनी कसून चौकशी करुन सोन्य -चांदिचे दागिणे, रोख रक्कम असा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त गुन्हे सुधीर हिरेमठ , सहा पोलीस आयुक्त गुन्हे आर.आर. पाटील , सहा पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ . अमरनाथ वाघमोडे , उपनिरीक्षक काळुराम लांडगे , पोलीस अंमलदार रविंद्र राठोड , रविंद्र गावंडे , राजेंद्र बोरसे , बाळु कोकाटे , अमित गायकवाड , अमित खानविलकर , सोमनाथ बोहाडे , महादेव जावळे , सुनिल चौधरी , सचिन उगले , प्रमोद हिरळकर , गणेश महाडीक , प्रमोद गर्जे , मारोती जायभाय , आनंदा बनसोडे यांनी केली आहे .