भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत आमदार डॉ. संजय कुटे

0
मुंबई : भाजपचे महाराष्ट्रातील बडे नेते दिल्लीत असून महाराष्ट्रातील नवीन प्रदेशाध्यक्ष निवडीवर सध्या खलबते सुरू आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक असलेले जळगाव-जामोदचे आमदार डॉ. संजय कुटे यांचे नाव प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे.
संजय कुटे हे फ्रंटलाइन नेते नसले तरी ते मागील चार टर्म आमदार म्हणून निवडून येत आहेत. ते मूळचे बुलडाण्यातील आहेत. काही वर्षांपासून ते देवेंद्र फडणवीस यांचे खासमखास आहेत. आश्चर्य म्हणजे प्रदेशाध्यक्षपदासाठी अमित शहा यांचे खास आशिष शेलार इच्छुक होते. मात्र शेलार हे फडणवीस यांच्या गुडबुकमध्ये नाहीत.
काही दिवसांपासून डॉ. संजय कुटे हे दिल्लीत आहेत. प्रदेशाध्यक्षपदासाठी त्यांचे नाव चर्चेत असल्याने त्यांना संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचाली नसून पक्षांतर्गत बैठका सुरू आहेत.’
यासाठी निवड शक्य
1. ओबीसींच्या राजकीय आरक्षणामुळे राज्यातील वातावरण तापलेले आहे. त्या पार्श्वभूमीवर कुटे यांचे नाव फडणवीस यांनी पुढे केल्याचे समजते.
2. राज्यातील सध्याची परिस्थिती हाताळायची असेल तर पुन्हा एकवार ओबीसी नेतृत्व पुढे आणणे गरजेचे आहे. त्यामुळे विद्यमान प्रदेशाध्यक्ष व मराठा नेते चंद्रकांत पाटील यांना पायउतार केले जाण्याची दाट शक्यता आहे.
3. ओबीसी नेतृत्व असलेल्या पंकजा मुंडेंनी फडणवीस यांच्याविरोधात एल्गार पुकारला आहे. त्यामुळे नवे ओबीसी नेतृत्व पुढे आणणे फडणवीस आणि पक्षासाठी अगत्याचे झाले आहे.
4. कुटे सध्या महाराष्ट्र भाजपचे उपाध्यक्ष आहेत. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनी शेवटचा जो मंत्रिमंडळ विस्तार केला, त्यात संजय कुटे यांना त्या मंत्रिमंडळात घेतले होते.
Leave A Reply

Your email address will not be published.