नागरिकांना भेटण्याच्या राखीव वेळेत आयुक्त ‘चाय पे चर्चा’मध्ये व्यग्र

वंचित युवा आघाडीचे ठिय्या मांडून गांधीगिरी आंदोलन

0

पिंपरी : नागरिकांना भेटण्याच्या राखीव वेळेत पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डिकर हे सत्ताधारी पदाधिकारी आणि नगरसेवकांसोबत एण्टीचेंबरला बसून ‘चाय पे चर्चा’ करण्यात वेळ घालवित आहेत. त्यामुळे नागरिकांना भेट देत त्यांच्या तक्रारी ऐकून घेत समस्या सोडविण्यास वेळ मिळेना झाला आहे. यामुळेच आयुक्तांच्या दालनासमोर तब्बल दीड तास बसूनही ते एण्टीचेंबरमधून बाहेर येत नसल्याने वंचित युवा आघाडीने दालनासमोरच ठिय्या मांडून गांधीगिरी आंदोलन सुरु केले.

अचानक झालेल्या गोंधळामुळे सुरक्षारक्षकांची धांदल उडाली. बाहेर गोंधळ सुरु झाल्याचे आयुक्तांना समजताच त्यांनी बैठक आटोपती घेवून नागरिकांना भेटण्यास वेळ सुरुवात केली. आयुक्तांना याविषयी कल्पना दिल्यानंतर आयुक्त हे एण्टीचेंबरच्या बाहेर आले. त्यांनी नागरिकांना भेटण्यास सुरुवात केली, तसेच झोपडपट्टीधारक नागरिकांना भेटून त्यांचे गा-हाणे ऐकून घेतले. त्यावर लवकरच तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिल्याचे पानपाटील यांनी सांगितले.

महापालिकेने विकसित केलेल्या स्पाईनरोड बाधित झोपडपट्टीधारकांचे गेल्या अकरा वर्षापासून अद्याप पुर्नवसन झालेले नाही. सेक्टर २२ संग्रामनगर येथील नागरिकांचे पुर्नवसन न झाल्याने आयुक्त श्रावण हर्डिकर यांना वंचित युवा आघाडीचे गुलाब पानपाटील हे बाधित नागरिकांना घेवून आज (गुरुवार) सायंकाळी चार वाजता भेटण्यास आले होते. यावेळी आयुक्तांना भेटण्यासाठी कित्येक नागरिक आपआपल्या तक्रारी घेवून आले होते.

महापालिकेचे आयुक्त नागरिकांना भेटण्यासाठी दुपारी ४ ते ६ या वेळेत भेट देत असतात. पण, आयुक्त हर्डिकर हे सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी व नगरसेवकांना घेवून एण्टीचेंबरला बसले होते. दीड तास बसूनही आयुक्त एण्टीचेंबरच्या बाहेर येत नव्हते. नागरिकांना भेटण्यास दिलेल्या वेळेत ते सत्ताधारी भाजप पदाधिकारी व नगरसेवकांसोबत चाय पे चर्चा करीत बसल्याने कित्येक नागरिकांना ताटकळ बसावे लागत होते. ज्येष्ठ अबालवृध्द नागरिक देखील आयुक्ताना भेटण्यास थांबून देखील स्वीय सहायकांनी त्याचे गांर्भियाने घेतले जात नव्हते.

सामान्य नागरिकांची गैरसोय होवू लागल्याने वंचित युवा आघाडीचे गुलाब पानपाटील आणि इतर सहकाऱ्यांनी दालनासमोर ठिय्या मांडले. त्यानंतर सुरक्षा विभागाची धांदल सुरु झाली. आयुक्तांना याविषयी कल्पना दिल्यानंतर आयुक्त हे एण्टीचेंबरच्या बाहेर आले. त्यांनी नागरिकांना भेटण्यास सुरुवात केली, तसेच झोपडपट्टीधारक नागरिकांना भेटून त्यांचे गा-हाणे ऐकून घेतले. त्यावर लवकरच तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिल्याचे पानपाटील यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.