पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील गुंडा विरोधी पथक गुन्हेगारांच्या बारीक हालचालीवर लक्ष ठेवून आहे. याच पथकाने कंबरेला पिस्तुल लावून भाईगिरी करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 1 देशी बनावटीचे पिस्तुल जप्त केले आहे.
आरशान शाकिर शेख (35, रा. दत्तवाडी, आकुर्डी) आणि उमेर शाखीर शेख (21, रा. आकुर्डी) या दोघांना अटक केली आहे. या प्रकरणी गुंडा विरोधी पथकाचे रामदास मोहिते यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
एक गुन्हेगार कंबरेला पिस्तुल लावून दहशत माजवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. हा गुन्हेगार आकुर्डी येथील विठ्ठल मंदिर परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथक प्रमुख सहाय्यक निरीक्षक हरिष माने आणि त्यांच्या पथकाने सापळा रचला. संशयित आल्यानंतर त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्तुल आढळून आले. पोलिसांनी त्याचा साथीदारास अटक केली आणि दुचाकी जप्त केली आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक आयुक्त प्रशांत अमृतकर, पथक प्रमुख हरिष माने, अंमलदार हजरत पठाण, प्रवीण तापकीर, गणेश मेदगे, विजय तेलेवर, रामदास मोहिते, प्रमोद गर्जे शुभम कदम या पथकाने केली आहे.