कचरा गोळा करणाऱ्यांच्या हस्ते संगीत स्वरस्वप्न कार्यक्रमाचे उद्घाटन
भाजपचे नेते शंकर जगताप यांनी केले कौतुक
पिंपरी : वाकड येथील श्री. गणेश कस्पटे युवा मंचच्या वतीने विशालनगर येथील सावित्री फुले उद्यानात वाकड आणि पिंपळेनिलखमधील नागरिकांसाठी दीपोत्सव तसेच संगीत स्वरस्वप्न या संगीत संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आयोजकांनी कचरा गोळा करून परिसर स्वच्छ ठेवणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या हस्ते आणि आरोग्यदूत असलेल्या परिसरातील डॉक्टरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करून समाजात एक चंगला संदेश दिला आहे. विशेष म्हणजे समाजाच्या तळागाळातील स्वच्छता कर्मचाऱ्यांना आणि डॉक्टरांना दिलेल्या या सन्मानाबद्दल आयोजकांचे भाजपचे युवा नेते शंकर जगताप यांनी कौतुक केले आहे. या कार्यक्रमाला रसिकांचा उत्तम आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शंकर जगताप यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून दीपोत्सव आणि गाण्यांचा आनंद घेतला.
यावेळी भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा उज्वलाताई गावडे, उषा काळे, माजी नगरसेवक विनायक गायकवाड, सागर आंगोळकर, आयोजक गणेश कस्पटे, मोहन कस्पटे, अनिल कस्पटे, सामाजिक कार्यकर्ते नितीन इंगवले, भाजपचे चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे प्रभारी संतोष कलाटे, सुरेश साठे, सुदेश राजे, अरुण देशमुख, आधार पाटील, रामहारी कस्पटे, आनंद कस्पटे, नामदेव कस्पटे, सुरेश कस्पटे, सिंकंदर कस्पटे, सिदार्थ वाघमारे, वृशाली मरळ, बबनराव वेडे-पाटील, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य संतोष ढोरे, रणजित कलाटे, राजेंद्र चिंचवडे, डॉ.संदिप लुणावत, डॉ.अजित पाटील, डॉ.ज्ञानेश्वर उपासे, डॉ.कुणाल जाधव, डॉ.सताने आणि संबधित परिसरातील नागरिक बांधव उपस्थित होते.