किरकोळ कारणावरुन पुण्यात 12 तासात दोन ठिकाणी गोळीबाराच्या घटना

0

पुणे : अगदी किरकोळ कारणावरून पुण्यात दोन वेगवेगळ्या भागात गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. पहिली घटना ही येरवाडा येथे सोमवारी (दि.23) रात्री साडे अकरा वाजता घडली तर दुसरी घटना ही सिंहगड रोड वर आज (दि.24) दुपारी बारा वाजता घडली आहे.

पहिल्या घटनेत शेकोटी करत बसलेल्या तरुणांनी केवळ ‘कहा के हो’ असे विचारल्याने एका व्यावसायिकाने त्यांच्यावर गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार येरवडा येथे घडला आहे. यामध्ये येरवडा पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रार दाखल कऱण्यात आली आहे.

अमितसिंग सत्यपाल सिंग (31, रा. कल्याणीनगर) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, सोमवारी रात्री फिर्यादी जेवण करून फिरायला गेले. रस्त्याच्या कडेला तरुण शेकोटी करून बसले होते. तरुण नेमके कोण आहेत, याची माहिती घेण्यासाठी ते तिकडे गेले.

त्यावेळी तरुणांनी त्यांची मोटार अडविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ते मोटरीतून बाहेर आले असताना तरुणांनी त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी स्वरक्षणार्थ हवेत गोळीबार केला. त्यावेळी झालेल्या झटापटीत सोनसाखळी गहाळ झाली असून, तरुणांनी गाडीच्या काचा फोडल्याचे अमित यांनी तक्रारीत म्हटले आहे.

तर दुसऱ्या तक्रारीत नवनाथ गलांडे यांनी फिर्यादित म्हटले आहे की, आम्ही शेकोटी करत असताना सिंग तेथे आले त्यांना भैय्या कहा के हो म्हणून विचारले असता त्याचा त्यांना राग आला व त्यांनी आमच्यातील एकावर पिस्तूल रोखले, झटापटीत पिस्तूलातून गोळी सुटली. घटनास्थळी जाऊन पोलिसांनी तपासणी केली असून येरवडा पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल कऱण्यात आले आहेत.

या घटनेला 12 तास ओलांडले नाही तोवर अणखी एका व्यावसायिकाने व्हॉटसअप वरील मॅसेजच्या भांडणातून भरदिवसा सिंहगड रोड वरील सनसीटी परीसरात हवेत गोळीबार केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी बांधकाम व्यावसायिक संतोष पवार व देवा राठोड आणि रमेश राठोड यांच्यासह इतर काहीजण सिंहगड रस्ता परिसरातील सनसिटी रोडवरील योगीराज अ‍ॅटो सेंटरमध्ये बोलत थांबले होते.

त्यावेळी देवा राठोड यांनी त्यांच्याकडे असलेल्या एका व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर संतोष पवार यांच्याबद्दल एक पोस्ट टाकली. त्यावरून संतोष पवार आणि देवा राठोड यांच्यात बाचाबाची झाली.  दोघांच्या भांडणात रमेश राठोड हे मध्ये पडले. त्यावेळी संतोष पवारने त्याच्या कमरेला असलेले पिस्तुल काढून रमेश राठोड यांच्या दिशेने फायर केले. रमेश राठोड यांच्या पायाला गोळी लागली. जखमी राठोड यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी या ठिकाणीही जाऊन पहाणी केली असून पुण्यात अवघ्या 12 तासाच्या फरकाने व्यावसायिकांकडून दोन वेगवेगळ्या ठिकाणी गोळीबार झाले. त्यामुळे शस्त्र व्यावसायिकांच्या संरक्षणाला दिले आहेत की दहशत पसरवण्याला असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.