आयकर छापे; पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर उर्से टोल येथे राष्ट्रवादीचे रास्ता रोको

0

पिंपरी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नातेवाईक आणि निकटवर्तीय यांच्यावर आयकर विभागाने छापे टाकले. याच्या निषेधार्थ पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर उर्से टोल नाका येथे अजित पवार यांच्या समर्थकांनी आंदोलन करत रास्ता रोको केले. यावेळी अर्धा तास द्रुतगती मार्ग अडवून धरल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीय आणि नातेवाईकांवर प्राप्तिकर विभागाने छापे टाकले आहेत. महाराष्ट्रात राजकीय तर्कवितर्क लावण्यात येत असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समर्थनात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरत आहेत. आज देखील मावळमध्ये राष्ट्रवादी च्या कार्यकर्त्यांनी उर्से टोल नाका येथे रास्ता रोको करत आंदोलन केले आणि मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. टोल नाका येथे रास्ता रोको केल्याने अर्धा तास पुणे आणि मुंबई या दोन्ही दिशेने वाहनांच्या रंगाच रांगा लागल्या होत्या. दरम्यान, काही मिनिटांनी रस्ता मोकळा करण्यात आला.

एखाद्या व्यक्तीविषयी शंका आल्यास त्याची चौकशी करण्याचा अधिकार तपास यंत्रणांना आहे. अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या निवासस्थानी छापे टाकण्याचा प्रकार म्हणजे अधिकाराचा गैरवापर आहे. उत्तर प्रदेशातील हिंसाचारानंतर मी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्या रागातून सत्ताधाऱ्यांनी ही कारवाई केली असावी, अशी शक्यता नाकारता येत नाही असं मत शरद पवार यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना गुरुवारी व्यक्त केलं. तपास यंत्रणांचा गैरवापर आणखी किती काळ सहन करायचा, हे आता नागरिकांनी ठरवावे असंही पवार म्हणालेत.

Leave A Reply

Your email address will not be published.