पुणे : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समतीच्या अध्यक्षासह इतरांच्या पोलिस कोठडी वाढ झालेली आहे. न्यायालयाने सोमवार प्रयत्न पोलीस कोठडी सुनावली आहे.
स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे, त्यांचा PA ज्ञानेश्वर किसनराव पिंगळे (56, रा. भोसरी), शिपाई अरविंद भीमराव कांबळे (रा. भीमनगर पिंपरी), संगणक ऑपरेटर राजेंद्र जयवंत शिंदे (रा. थेरगाव वाकड) आणि लिपिक विजय शंभुलाल चावरिया (रा. धर्मराजनगर) यांना शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.
लांडगे यांचे स्वीय सहायक ज्ञानेश्वर पिंगळे याने तक्रारदार ठेकेदाराला टक्केवारीचे पैसै ‘वर सोळा जणांना द्यावे लागतात’ असे सांगितले. तसेच स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांनीच पिंगळे याला टक्केवारीबाबत आदेश दिल्याचे संभाषण व्हॉइस रेकॉर्डवर रेकॉर्ड झाले आहे.
याबाबत आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी संबंधित 16 व्यक्तींची नावे सांगण्यास नकार दिला आहे. त्यामुळे याबाबत सखोल चौकशी करण्यासाठी व गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी आरपींच्यो पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली होती. त्यानुसार न्यायालयाने सर्व आरोपींच्या पोलीस कोठडीत सोमवारपर्यंत वाढ केली आहे.
तक्रारदार हे जाहिरात ठेकेदार आहे. त्यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेडील २६ वेगवेगळ्या जागांमध्ये होर्डिंग उभारण्यासाठी निविदा भरल्या होत्या. 2019 व 2020 च्या निविदा मंजूरही झाल्या. मात्र वर्क आॅर्डर निघाली नसल्याने त्यांनी स्थायी समितीचे अध्यक्षांचे स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर पिंगळे याच्याशी संपर्क केला. त्याने बोली रकमेच्या तीन टक्के रक्कमेनुसार 10 लाख रुपयांची मागणी केली.
तडजोडीअंती सहा लाख रुपयांचे देण्याचे ठरले.
एक लाख 18 हजार रुपयांची रक्कम पहिल्या टप्प्यात देण्याचे ठरले आणि उर्वरित रक्कम वर्क आॅर्डर प्राप्त झाल्यानंतर देण्याचे ठरले. एक लाख 18 हजार रुपयांची रक्कम पिंगळे यांनी स्वीकारल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना अटककारवाई केली आणि पाच जणांना अटक केली.