मुंबई : अत्यावश्यक औषधांच्या किंमती एप्रिलपासून वाढणार आहेत. केंद्र सरकार आता औषध कंपन्यांना अत्यावश्यक औषधांच्याकिंमती वाढवण्याची परवानगी देणार आहे. त्यामुळे आधीच महागाईनं त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी झळ बसणारआहे.
एप्रिल महिन्यापासून अत्यावश्यक औषधांच्या किंमतीत वाढ होणार आहे. पेनकिलर, ॲंटिबायोटिक तसेच हृदयरोगपर्यंतच्या सर्वऔषधांच्या किंमतीत वाढ होणार आहे. महागाईने हैराण असलेल्या सर्वसामान्यांच्या खिशावरील बोजा वाढणार आहे. औषधांच्याकिंमतीत 12 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. सलग दुसऱ्या वर्षी अत्यावश्यक औषधांच्या किंमतीत वाढ करण्यात येणारआहे.
दुसरीकडे, शेड्युल ड्रग्जच्या किंमतीत देखील वाढ होणार आहे. मात्र, यासंदर्भात किंमती किती टक्क्यांनी वाढणार याची अद्याप माहितीसमोर आलेली नाही. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर फार्मा उद्योगाकडून औषधांच्या किमतीत वाढ करण्याची मागणी करण्यात येतहोती. घाऊक किंमत निर्देशांकांमधील बदलांच्या अनुषंगाने औषध कंपन्यांना दरवाढ करण्याची परवानगी देण्यासाठी केंद्र सरकार तयारअसल्याचं समोर आलं आहेत.
अत्यावश्यक औषधांच्या किंमतीत वाढ करण्यात येणार असून त्यामुळे पेनकिलर, अँटी–इन्फेक्टीव्ह, कार्डियाक ड्रग्स आणिअँटीबायोटिक्ससह अत्यावश्यक औषधांच्या किमती वाढणार आहेत. वार्षिक घाऊक किंमत निर्देशांक (WPI) मधील बदलानुसारऔषध कंपन्यांना वाढ करण्याची परवानगी देण्यासाठी परवागनी देण्याची सरकारची तयारी आहे. WPI मधील वार्षिक बदल, सरकारनेअधिसूचित केल्यानुसार, 2022 मध्ये 12.12 टक्क्यांपर्यंत असू शकते. सोमवारी औषध किमती नियामक राष्ट्रीय फार्मास्युटिकलप्राइसिंग अथॉरिटी (NPPA) ने परिपत्रक जाहीर करत ही माहिती दिली आहे.