राणा दाम्पत्याच्या कोठडीत वाढ; जामीन अर्जावर बुधवारी सुनावणी

0

मुंबई : राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण झाली. राणा दाम्पत्याला न्यायालयाकडून अद्याप दिलासा मिळालेला नाही. जामीन अर्जावर निकाल देण्यासाठी आज (सोमवार) पाच वाजताची वेळ देण्यात आली होती. परंतु पाच वाजेपर्यंत निकाल लिहून पूर्ण झाला नाही. त्यामुळे खा. नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर पडली आहे. दरम्यान उद्या ईद सणाची सुट्टी असल्याने निकाल बुधवारी सकाळी 11 वाजता सुनावला जाणार आहे.

न्यायालयाकडे आज दुपारी अजून एक महत्त्वाची केस आली होती. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर त्यावर विचार करणं कोर्टाला गरजेचं वाटलं. बुधवारी याप्रकरणावर कोणताही युक्तीवाद केला जाणार नसून, थेट निकाल सुनावला जाणार असल्याची माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली.

Mumbai Court likely to pronounce verdict in bail applications filed by independent legislators Navneet Rana and Ravi Rana by 5 pm in sedition case.

Special Judge says order not yet ready due to heavy workload. #Sedition #NavneetRana #HanumanChalisaRow pic.twitter.com/SuVlblavWD

— Bar & Bench (@barandbench) May 2, 2022

प्रक्षोक्षक वक्तव्य केल्याच्या आणि सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपांप्रकरणी मागील आठवडाभरापासून खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा अटकेत आहेत. त्यांच्या जामिनाबाबत सत्र न्यायालय सोमवारी काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु न्यायाधीश राहुल रोकडे यांनी यावर अद्याप कोणताही निकाल दिलेला नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.