मुंबई : राज्यातील वेगवेगळ्या ड्रग्स कारवाया मुळे चर्चेत आलेले एनसीबीचे मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्या नावे असलेल्या बार परवाना रद्द करण्यात आला आहे, ठाण्याचे जिल्ह्याधिकारी राजेश नार्वेकर यांनी वानखेडेंचा बार परवाना रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.
याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने वानखेडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. वयाच्या 17व्या वर्षी नावावर बार परवाना घेतल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारणे दाखवा नोटीस बाजवण्यात आली होती. राजेश नार्वेकर यांची याबाबत सहा पानी आदेश दिला आहे. यात वानखेडेंनी 1997 मध्ये बारचा परवाना घेताना खोटी कागदपत्रे सादर केल्याचे म्हटलं आहे. महाराष्ट्र प्रतिबंध कायद्याच्या कलम 54 नुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत समीर वानखेडेंवर आरोप केला होता की, अवघ्या 17व्या वर्षी त्यांना बारचा परवाना मिळाला होता. नवी मुंबईत असलेला सदगुरू रेस्ट्रो बारचा परवाना हा समीर वानखेडे यांच्या नावावर होता. समीर वानखेडे यांच्या नावावर हा बारचा परवाना झाला त्यावेळी त्यांचे वय अवघे 17 वर्षे होते. अल्पवयीन असतानाही बारचा परवाना कसा मिळाला. याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्काच्या ठाणे विभागाने समीर वनाखेडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती.