मावळ : पवना धरण यंदा जुलैमध्येच 85 टक्के भरले असल्याने कालपासून धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामध्ये आज (शुक्रवारी) सकाळी नऊ वाजल्यापासून वाढ केली असून 4650 क्युसेकने विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.
पवना धरणात 85 टक्के पाणीसाठा झाला आहे. हवामान अंदाजानुसार धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे धरणाच्या पातळीमध्ये वाढ होत आहे. धरणामध्ये होणारी पाण्याची आवक पाहता धरणाच्या सांडव्यावरुन गुरुवारी दुपारी 4 वाजल्यापासून पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. विद्युत जनित्राद्वारे 1400 क्युसेक व सांडव्याद्वारे 2100 क्युसेक असा एकूण
3500 क्युसेक विसर्ग करण्यात येत आहे.
पाण्याचा विसर्गामध्ये आज सकाळी वाढ करण्यात आली आहे. 3500 क्युसेक वरून वाढवून 4650 क्युसेक करण्यात आला आहे.विद्युत जनित्राद्वारे 1400 आणि सांडव्याद्वारे 3250 क्युसेक असा एकूण 4650 क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
पवना धरणाच्या खालील बाजुस नदीतीराकडील सर्व गावातील नागरिकांनी दक्ष राहावे. नदी तीरावरील जनावरे, मोटारी, अवजारे व इतर सामुग्री त्वरीत सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावी. जेणेकरून कुठलीही जिवीत व वित्तहानी होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.
# गेल्या 24 तासात झालेला पाऊस = *62मि.मि.*
# 1 जूनपासून झालेला पाऊस = *1774मि.मि.*
# गेल्या वर्षी आजच्या तारखे पर्यंत झालेला एकूण पाऊस = 502
# धरणातील सध्याचा पाणीसाठा = *87.41% टक्के*
# गेल्या वर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा = * 33.94% टक्के*
# गेल्या 24 तासात पाणीसाठ्यात झालेली वाढ
= *1.04% टक्के*
# 1 जूनपासून पाणीसाठ्यात झालेली वाढ = *55.82% टक्के*