पुणे : भारत-श्रीलंका टी-20 मालिकेत गुरुवारी पुण्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात आशियाई चॅम्पियन श्रीलंकेने टीम इंडियाचा 16 धावांनी पराभव केला. 207 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ अक्षर पटेल – सूर्यकुमारच्या अप्रतिम भागीदारीनंतरही केवळ 190 धावांपर्यंत मजल मारू शकला.
श्रीलंकेच्या या विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेत प्रत्येकी एक अशी बरोबरी झाली आहे. तिसरा आणि निर्णायक सामना 7 जानेवारीला राजकोटमध्ये खेळला जाईल.
पुण्याच्या एमसीए मैदानावर भारतीय कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला, पण श्रीलंकेचे सलामीवीर कुसल मेंडिस आणि पाथुम निसांकाने भारतीय कप्तानचा हा निर्णय चुकीचे सिद्ध केला. या जोडीने झटपट धावा केल्या.
एकवेळ लंकन संघाने 8 षटकात विकेट न गमावता 80 धावा केल्या होत्या. मध्यंतरी भारती. फिरकीपटूंनी धावगतीवर ब्रेक लावला, पण श्रीलंकेच्या फलंदाजांनी अधिक आक्रमक खेळ केला. कर्णधार शनाका आणि करुणारत्ने या जोडीने अखेरच्या 5 षटकात 77 धावा करत संघाची धावसंख्या 206 धावांपर्यंत नेली.