मुंबई : शिवेसेना आणि आपण एकत्र काम करु शकतो असं कोणाला पटलं नसतं मात्र ते सत्यात उतरले आहे. आपण राज्याला वेगळ्या विचारांचं सरकार दिलं असून हे सरकार पुढील पाच वर्ष टीकेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी व्यक्त केला आहे.
राष्ट्रवादीच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यामध्ये महत्वाची भूमिका निभावणाऱे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हे मोठं विंधान केले आहे. तसेच राष्ट्रवादी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लढण्याचे संकेत दिले आहे.