देशी लस महिनाअखेर मिळण्याची शक्यता; पण…

0

नवी दिल्ली ः ”ब्रिटनची फायझर करोना लस वापराला मंजुरी मिळाली असून पुढील आठवड्यात उपलब्ध होणार आहे. याच दरम्यान भारतातदेखील डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्याच किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात देशी लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे,” असे मत एम्सचे संचालक डाॅ. रणदीप गुलेरिया व्यक्त केले.

गुलेरिया म्हणाले की, ”आमच्याकडील लसदेखील अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. भारतीय नियमत लस वापरण्यासाठी अंतिम मंजुरी देईल, अशी आम्हाला आशा आहे. त्यानंतर आम्ही करोना लस टोचायला सुरू करू शकतो. ही लस पुर्णपणे सुरक्षित आहे, हे सिद्ध करण्यासाठी आमच्याकडे पुरेसा डेटा आहे. लसीच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही तडजोड केलेली नाही”, असेही त्यांनी सांगितले.

कोव्हिशि्ल्ड चाचणीवादावर बोलताना डाॅ. गुलेरिया म्हणाले की, ”चेन्नईच्या स्वयंसेवकावर जो इफेक्ट झाला आहे, तो लसीमुळे झाला नाही.  त्याचे काही वेगळे कारण असू शकते. आम्ही मोठ्या संख्येने लोकांना लस टोचली आहे. त्या स्वयंसेवकाला काहीतरी आजार असू शकतात. हा इफेक्ट चाचणीचा आहे, असं वाटत नाही”, असेही स्पष्टीकरण डाॅ गुलेरिया यांनी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.