कोवॅक्सिन आणि स्पुटनिक व्ही लसीचा डोस घेणाऱ्या व्यक्तींसमोर भलत्याच अडचणी

0

नवी दिल्ली : भारतात कोरोनाचा फैलाव अधिक असल्यानं सरकारने लसीकरणाला सुरुवात केलीय. सध्या कोरोनाबाधित रुग्णाच्या संख्येत घट होत आहे. मात्र, लसीकरण सुरु आहे. देशात कोवॅक्सिन, कोविशील्ड आणि स्पुटनिक व्ही या तीन लसी दिल्या जात आहेत.

कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेला अटकाव घालण्यासाठी लसीकरणाची गती वाढवण्याचा प्रयत्न होत आहे. कोवॅक्सिन आणि कोविशील्ड या लसीचा वापर अधिक प्रमाणात सुरु आहे. परंतु, आता कोवॅक्सिन आणि स्पुटनिक व्ही लसीचा डोस घेणाऱ्या व्यक्तींसमोर भलत्याच अडचणी समोर आल्या आहेत.

कोवॅक्सिन आणि स्पुटनिक लसीला अजूनही जागतिक आरोग्य संघटनेने मंजुरी दिली नाही.मात्र, कोविशील्डला फक्त WHO ने मान्यता दिलीय. दरम्यान, अनेक विद्यार्थ्यांनी कोवॅक्सिन आणि स्पुटनिक व्ही लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. परंतु, त्यांना अमेरिकेत प्रवेश केल्यावर पुन्हा लस घ्यावी लागणार आहे.
काही काळानंतरच विविध कंपनीच्या लसी घेणे योग्य आहे का ? असा संभ्रम विद्यार्थ्यांमध्ये होत आहे.

मार्च महिन्यापासून आतापर्यंत अमेरिकेतील 400 हून विद्यापीठांनी लसीकरणाबद्दल सूचना जारी केल्या आहेत. कोवॅक्सिन आणि स्पुटनिक व्ही लस घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी अमेरिकेत आल्यावर पुन्हा लसीचे डोस घ्यावे लागणार आहेत. अशी सूचना विद्यापीठांकडून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, लसीच्या डोसबाबत डॉक्टरांनी अथवा तज्ज्ञांनी कोणतही भाष्य केलेले नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.