कुख्यात गुंड गजा मारणे व त्याच्या 8 साथीदारांना जामीन

0

पुणे : तळोजा कारागृहातून बाहेर काढलेल्या रॅली प्रकरणी अटक केलेल्या कुख्यात गुंड गजा उर्फ गजनान मारणे व त्याच्या 8 साथीदारांना आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. दरम्यान पिंपरी चिंचवड पोलीस त्याला घेऊन जाण्यासाठी न्यायालयात आले होते. मात्र न्यायालयाने त्यांना घेऊन जाण्यास देखील नकार दिला आहे.

गजानन उर्फ गजा पंढरीनाथ मारणे (48), प्रदीप दत्तात्रय कंधारे (36), बापु श्रीमंत बागल (34), आनंता ज्ञानोबा कदम (37), गणेश नामदेव हुंडारे (39), रुपेश कृष्णराव मारणे (38), सुनील नामदेव बनसोडे (40) श्रीकांत संभाजी पवार (34) आणि सचिन आप्पा ताकवले (32) अशी जामीन झालेल्याची नावे आहेत.

तर याप्रकरणी अमित कदम, अभिजित विभूते, सोनू गोडांबे, विकी कटारे, राज गायकवाड, सचिन कांबळे, पप्पू घोलप, राहुल दळवी, संतोष शेलार, संदीप पिसाळ, अमित कुलकर्णी, निखिल साळुंखे, सागर पासलकर, अमोल तापकीर, अमृत मारणे, शेखर आडकर, श्याम जगताप, महेश (पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही) यांच्यावर कोथरुड पोलीस ठाण्यात भादवि कलम 267, 268, 270, 143, 149 सह डिझास्टर मॅनेजमेंट कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत उपनिरीक्षक संतोष पाटील यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे.

पोलिसांच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले की, 500 गाड्यांच्या ताफ्यात मिरवणूक काढली, इतक्या मोठ्या प्रमाणात वाहने आणण्याची काय गरज होती, यामागे काही वेगळं कट होता का हे जाणून घेण्यासाठी  त्यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी वकिलांनी केली. याला आरोपीतर्फे ऍड. विजयसिंह ठोंबरे यांनी बाजू मांडत विरोध केला. न्यायालयाने तो मान्य करत त्यांची 15 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.

गजनान मारणे यांच्या विरोधात चुकीचे कलमे लावली होती. अटकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन केले गेले नाही, असे ऍड, विजय ठोंबरे यांनी न्यायालयात म्हणणे मांडले.

या दरम्यान, तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात गजनान मारणे याला घेऊन जाण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांची व्हॅन शिवाजीनगर न्यायालयात आली होती. पण, ठोंबरे यांनी प्रोड्युस वॉरंटला न्यायालयात विरोध केला. न्यायालयाने त्याला हजर करण्याचा आदेश फेटाळला.

Leave A Reply

Your email address will not be published.