मुंबई : मागील सुमारे साडेचार महिन्यांपासून स्थिर असलेल्या इंधनांच्या भावांमध्ये सलग सातव्या दिवशी दरवाढ झाली आहे. यामुळे डिझलचे भाव शंभरीच्या उंबरट्यावर पोहचले आहेत. मागील सात दिवसात पेट्रोल डिझेलच्या भावात सरासरी 4 रुपयांची वाढ झाली असून पुढील काही दिवसात 9 ते 12 रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता असल्याने महागाईचा मोठा भडका पहायला मिळणार आहे.
आज सातव्या दिवशी पेट्रोलच्या भावात 80 पैसे तर डिझेलच्या भावात 70 पैश्यांची वाढ झाली आहे. यामुळे मुंबईमध्ये आज पेट्रोलचा भाव लिटर मागे 115.04 रुपये तर डिझेलचा भाव 99.25 रुपये ऐवढा झाला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलावे भाव कमी झाले असताना पेट्रोलियम कंपन्यांकडून ही भाववाढ करण्यात आली आहे. रशिया युक्रेन युद्धाची झळ कच्च्या तेलाच्या बाजाराला बसली असून उत्पादन च पुरवठा यावर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे इंधन दरवाढ आजुन होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
पाच राज्यातील निवडणुकांमुळे तब्बल 137 दिवस पेट्रोल डिझेलचे भाव स्थिर ठेवण्यात आले होते. निवडणुकांच्या निकाल जाहिर होताच 22 मार्चपासून इंधर दरवाढ सुरु झाली आहे. आठवडाभरातील ही सातवी दरवाढ आहे.