महागाई ! पेट्रोल-डिझेल सोबत घरगुती गॅसच्या दरात वाढ

0

नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांपासून ज्या गोष्टीची शक्यता वर्तवली जात होती ती आज झाली आहे. देशात पेट्रोल-डिझेलचे दर आज वाढले आहेत. पेट्रोल-डिझेलच्या दरातील ही वाढ कच्च्या तेलातील वाढीमुळे आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलमध्ये 80 पैसे प्रति लीटरची वाढ करण्यात आली आहे.

आज सकाळी 6 वाजल्यापासून नवीन किंमती लागू झाल्या आहेत. आजपासून रोज किंमती वाढण्याची सुद्धा शक्यता आहे. यापूर्वी 4 नोव्हेंबरला देशात इंधनाचे दर वाढले होते.

14.2 kg Domestic cooking gas LPG price hiked by Rs 50 per cylinder. Will now cost Rs 949.50 effective from today: Sources pic.twitter.com/jYvh0RWZG5

— ANI (@ANI) March 22, 2022

मुंबईत पेट्रोल 110.82 रू.

भारतीय पेट्रोलियम विपणन कंपनी इंडियन ऑयल कॉर्पोरेशनच्या लेटेस्ट अपडेटनुसार, देशाची आर्थिक राजधानी मुंबईत 22 मार्च 2022 ला पेट्रोलचा दर 109.98 रूपये प्रति लीटरवरून वाढून 110.82 रूपये प्रति लीटरवर पोहचला आहे. तर डिझेलचा दर 95 रूपये प्रति लीटरवर पोहचला आहे.

दिल्लीत पेट्रोल 96.21 रू.

दिल्लीत पेट्रोलची किंमत 95.41 रूपये प्रति लीटरवरून वाढून 96.21 झाली आहे. तर डिझेलचा भाव 86.67 रूपये प्रति लीटरवरून महाग होऊन आता 87.47 रूपयांवर पोहचला आहे.

घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 50 रू.ची वाढ

तसेच घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 50 रूपयांची वाढ झाली आहे. नवीन किंमत आज मंगळवारपासून लागू झाली आहे. घरगुती एलपीजी सिलेंडरचा दर 6 ऑक्टोबर 2021 च्या नंतर वाढला आहे. आजपासून घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमती दिल्लीत 899.50 रूपयांवरून वाढून 949.50 रूपये झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.