पिंपरी : बंद घरांची रेकी करून दिवसा घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्याला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 12 लाख 20 हजार रुपये किमतीचे 20 तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे वाकड पोलीस ठाण्यातीलदोन आणि चतुश्रुंगी पोलीस ठाण्यातील एक असे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.
सचिन भीमराव पाटील (32, रा. घोरपडीगाव, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 मे रोजी शिवराजनगर रहाटणी येथे भर दिवसा एक घरफोडीझाल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी चंद्रकांत चव्हाण यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणाचा तपासकरत असताना वाकड पोलिसांना जगताप डेअरी येथे एक दुचाकीस्वार संशयितपणे जाताना दिसला.
पोलिसांना पाहून तो पळून जाऊ लागल्याने त्याला ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याच्याकडे घराचा कडीकोयंडा तोडण्यासाठी वापरलेला एक स्टीलला रॉड आढळून आला. अधिक चौकशीत संशयित व्यक्ती सचिन पाटील हा शिवराजनगरयेथील घरफोडीतील आरोपी असल्याचे उघड झाले. सचिन पाटील याने वाकड आणि चतुश्रुंगी भागात तीन घरफोड्या केल्या असल्याचेउघडकीस आले. पोलिसांनी त्याच्याकडून 12 लाख 20 हजार रुपये किमतीचे 20 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीसउपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे, सहायक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेशजवादवाड, पोलीस निरीक्षक रामचंद्र घाडगे, सहायक निरीक्षक संतोष पाटील, उपनिरीक्षक सचिन चव्हाण, सहायक फौजदार बिभीषणकन्हेरकर, बाबाजान इनामदार, राजेंद्र काळे, पोलीस अंमलदार वंदू गिरे, संतोष बर्गे, स्वप्नील खेतले, अतिश जाधव, प्रमोद कदम, अतिक शेख, विक्रांत चव्हाण, प्रशांत गिलबिले, अजय फल्ले, तात्या शिंदे, स्वप्नील लोखंडे, सौदागर लामतुरे, विनायक घारगे, रमेशखेडकर, कौंतेय खराडे, भास्कर भारती, पोलीस शिपाई पंडित यांनी केली आहे.