पुणे : भाजपचे माळशिरसचे आमदार राम सातपुते यांच्या शाही विवाह सोहळ्याच्या चौकशीचे आदेश पुण्याचे पोलीस सहआयुक्त रवींद्र शिसवे यांनी दिले आहेत.
आमदार राम सातपुते यांचा विवाह रविवारी झाला. त्यांच्या विवाह सोहळ्यात 50 पेक्षा जास्त लोक होते, असा ठपका ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी आता चौकशी करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या विवाह सोहळ्याला विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी आवर्जुन हजेरी लावली होती.
विवाह सोहळ्यात 50 हून अधिक पाहुणे उपस्थित राहू नये, असा नियम आहे. मात्र, भाजपचे आमदार राम सातपुते यांच्या शाही विवाह सोहळ्यात गर्दी मावत नसल्याचं समोर आलं होतं. या विवाह सोहळ्यातील गर्दीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाले होतं. यावरून भाजपवर टीकेची झोडही उठली आहे. आता हे प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये गेलं आहे. पुण्याचे पोलीस सहआयुक्त रवींद्र शिसवे यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहे.