मुंबई : चित्रपट निर्माते रोहित शेट्टीने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. यानंतर, अक्षय कुमारने त्याच्या ‘सूर्यवंशी’ चित्रपटाबद्दल एक ट्विट केलं, जे पाहून छत्तीसगडचे विशेष डीजीपी आर के विज थोडे ‘चिडले’. मात्र खिलाडी कुमारने लवकरच IPS ची नाराजी दूर केली.
वास्तविक, अक्षय कुमारने एक ट्विट केलं. त्याने लिहिले, ‘आज अनेक कुटुंबे उद्धव ठाकरे यांचे आभार मानतील! 22 ऑक्टोबरपासून महाराष्ट्रातील चित्रपटगृहे पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिल्याबद्दल आभारी आहोत. आता कोणीही थांबवणार नाही – पोलीस येत आहेत… ‘#Soooryavanshi #Diwali2021
या ट्विटसह त्याने एक फोटो शेअर केला आहे, ज्यात अक्षय कुमार, अजय देवगण, रणवीर सिंह आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी दिसत आहेत. फोटोत स्पष्ट दिसत आहे की इन्स्पेक्टरची भूमिका करणारा रणवीर सिंह टेबलवर बसलेला आहे, तर अक्षय कुमार आणि अजय देवगण, जे वरिष्ठ अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहेत, मात्र ते दोघंही उभे आहेत.
हा फोटो पाहून डीजीपी आरके विज यांनी अक्षय कुमारचे हे ट्विट रिट्विट केले आणि एका कमेंटमध्ये लिहिले- ‘इन्स्पेक्टर साहेब बसले आहेत आणि एसपी साहेब उभे आहेत, ऐसा नहीं होता है जनाब.’
विशेष डीजीपी आर के विज यांच्या ट्विटला उत्तर देताना अभिनेता अक्षय कुमार म्हणाला- ‘जनाब, हे पडद्याच्या मागचे फोटो आहेत. आम्हा कलाकारांसाठी… कॅमेरा चालू होताच, आम्ही परत प्रोटोकॉलवर येतो. आमच्या महान पोलीस दलांना नेहमीच सलाम. आशा आहे की जेव्हा तुम्ही चित्रपट पाहाल तेव्हा तुम्हाला तो आवडेल.
आता अक्षयचे हे ट्विटही खूप व्हायरल होत आहे. आरके बिज हे 1988 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत आणि छत्तीसगडमध्ये विशेष डीजीपी म्हणून कार्यरत आहेत. आर के विज ट्विटरवर खूप सक्रिय आहेत आणि सर्व मुद्द्यांवर सतत ट्वीट करतात.