आयुक्तालयात हजर झालेले पोलीस निरीक्षक ‘वेट अँड वॉच’ वर
कारवायांचे सत्र सुरु मात्र ठराविक धेंडे सोडून
पिंपरी : पिंपरी–चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सध्या बदल्यांचे सत्र सुरु आहे. त्यामुळे काही ठिकाणी नाराजीचा सूर उमटतआहे. नागपूर, मुंबई तसेच बाहेरून बदली झालेले 30 पोलीस निरीक्षक आयुक्तालयात हजर झाले आहेत. मात्र त्यांना कोठेच पोस्टिंग नदिल्याने ते सध्या आयुक्तालयाच्या बाहेर मंदिराच्या आवारात, रस्त्यावर दिवसभर बसल्याचे दिसून येते. तर अनेक पोलीस ठाण्याचाकारभार सहायक निरीक्षक हाकत आहेत. यामुळे अवैध धंद्यावाल्यांचे फोफावत आहे. मागील आठवड्यात गुन्हे शाखेच्या पथकांकडूनअवैध धंद्यांवर जोरदार कारवाया करण्यात आल्या असून त्या देखील सुरु आहेत.
देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत तळवडे भागात असलेल्या एका जुगार अड्यावर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने तीन दिवसांपूर्वीछापा मारला. या कारवाईमध्ये गुन्हे शाखेने तब्बल ट्रकभर लोकांना अटक करून गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणले होते. त्याचे पुढेकाय झाले, याबाबत माहिती पुढे आली नाही. त्यानंतर बुधवारी पुन्हा मुकाई चौकातील जुगार अडड्यावर छापा मारून, 70 पेक्षा अधिकलोकांना अटक करण्यात आली.
वरील दोन्ही कारवाया गुन्हे शाखेने केल्या आहेत. मात्र, महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोशी टोल नाक्यावरून पुढेगेल्यावर डाव्या बाजूला असलेल्या जुगाराच्या ‘मॉल’वर अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही. अवैध दारू आणि एखादी किरकोळकारवाई वगळता चाकण, दिघी, तळेगाव, शिरगाव आणि हद्दीतील बड्या पोलीस ठाण्यांच्या परिसरात असलेल्या अवैध धंद्यांवरकारवाई करण्यात आलेली नाही.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्या होत आहेत. कार्यकारी पदावरील अधिकारीअकार्यकारी पदावर तर ज्यांचा आयुक्तालयातील कार्यकाल पूर्ण झाला आहे, त्यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या होत आहेत. मात्र, काहीअधिकारी या बदल्यांवरून नाराज झाले असून सुमारे दहा अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकारणाचा (मॅट) दरवाजाठोठावला आहे. दोन तारखांना सुनावणी झाल्यानंतर आता न्यायाधिकरणाने पुढील सुनावणीसाठी 27 फेब्रुवारी ही तारीख दिली आहे.
पोलीस ठाण्यांचा कारभार रामभरोसे
बदल्या झाल्यानंतर पोलीस ठाण्यांना अधिकारी देण्यात आले नाहीत. त्यामुळे पोलीस ठाण्यांचा सर्व कारभार सहायक निरीक्षकदर्जाच्या अधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे. अधिकाऱ्यांच्या झालेल्या बदल्या – त्यावरून रंगलेले नाराजीनाट्य – न्यायाधिकरणानेदिलेली स्थगिती यामुळे शहरातील काही पोलीस ठाण्यांचा कारभार रामभरोसे आहे.
वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेले निरीक्षक हजर झाले आहेत. तर आपल्यावर अन्याय झाल्याचे सांगत मॅट मध्ये गेलेले अधिकाऱ्यांचेभिजत घोंगडे आहे. याबाबत लवकरच निर्णय होणार आहे. मात्र या सगळ्यात अनेक पोलीस ठाणे वरिष्ठाशिवाय सुरु आहेत. तर अंतर्गतबदली करण्यात आलेले काही वरिष्ठ निरीक्षक अद्याप तेथेच आहेत.
म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोशी टोल नाक्यावरून पुढे गेल्यावर डाव्या बाजूला असलेल्या जुगाराच्या “मॉल“वरअद्याप कारवाई करण्यात आलेली नाही. त्याच बरोबर, दिघी, तळेगाव, शिरगाव परिसरात असलेल्या अवैध उद्योगांवर कारवाई करण्यातआलेली नाही.