१४ ला बेकायदेशीर टू व्हीलर विरोधामध्ये तीव्र आंदोलन : बाबा कांबळे

0

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पुणे शहरामध्ये बेकायदेशीरपणे टू व्हीलर बाइक सुरु असून ओला,उबेर, रॅपिडो  या बेकायदेशीर ॲप मुळे रिक्षा व्यवसाय मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम झाला असून रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे या विरोधामध्ये रिक्षा चालकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून या तीव्र भावनेचा या संतापाचाचा फायदा उठवण्याचा प्रयत्न काही जण करत आहेत,

याचाच एक भाग म्हणून बेमुदत रिक्षा बंदची हाक एका संघटनेने दिली आहे ही हाक म्हणजे अत्यंत चुकीचे असून कोविड मुळे अगोदरच त्रस्त व मेटाकुटीला आलेल्या रिक्षाचालकांचा आर्थिक गणित बिघडलेल आहे रिक्षाचालकांची हप्ते थकले असून त्यांना हप्ते भरणे ही अवघड झाले आहे रिक्षा चालक घर कसे चालवणार मुलांचे शिक्षण मुलांची फी अशा असंख्य प्रश्नांनी ते त्रस्तलेलेत आहेत अशा परिस्थितीमध्ये रिक्षा बंद करून  त्यांना आर्थिक अडचण निर्माण होइल   यामुळे या बंदला आमचा विरोध असून लोकशाही मार्गाने दिनांक १४-२-२२ रोजी सकाळी ११वाजता  पुणे येथे शहरातील सर्व संघटनांच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे, यासाठी पिंपरी येथे सकाळी 10 वाजता पिंपरी-चिंचवड शहरातील रिक्षाचालक-मालक एकत्र येणार आहेत आणि पुण्याकडे रवाना होणार आहेत या आंदोलनामध्ये रिक्षाचालक मालकांनी सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र रिक्षा पंचायत, रिक्षा ब्रिगेड संस्थापक अध्यक्ष व ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीचे महाराष्ट्राचे  नेते बाबा कांबळे यांनी केला आहे,

आज बाबा कांबळे यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील रिक्षाचालकांची संवाद साधला यावेळी ते बोलत होते.

यावेळी रिक्षा ब्रिगेड महाराष्ट्र प्रमुख बाळासाहेब ढवळे, रिक्षा ब्रिगेड शहराध्यक्ष संजय दौंडकर, शहर कार्याध्यक्ष लक्ष्मण भाऊ शेलार, जाफर भाई शेख , धनंजय कुदळे , अनिल शिरसाट, रवींद्र लंके, सुरज सोनवणे,तुषार लोंढे, अविनाश जोगदंड, विजय ढगारे, सिद्धार्थ साबळे ,प्रवीण ठोंबरे ,प्रदीप आहिरे ,संजय तापकीर, सुनील चव्हाण ,रोहिदास पिंगळे, मनोज राऊत, विश्वास लोंढे ,अभिजीत जाधव ,रोहित जबडे, विजय नांगरे रमेश बसागरे,उपस्थित होते

यावेळी बाबा कांबळे म्हणाले बँक च्या नावाखाली पिंपरी इंदूर आणि पुणे शहरामध्ये रिक्षा फोडण्यात आल्या हे बरोबर नसून आर्थिक अडचणी मध्ये असेल रिक्षाचालकांच्या रिक्षा फोडणं हे अत्यंत चुकीचे आहेत कोणी कायदा हातात घेऊ नये अन्यथा जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा बाबा कांबळे यांनी दिला.

केंद्र व राज्य सरकार हे गोर गरिबांना आपसामध्ये भांडवत असू ओला उबर सारख्या भांडवलदार उद्योजकांना मदत करत आहे व रिक्षाचालकांन वरती अन्याय करत आहे यामुळे बेकायदेशीर टू व्हीलर बाइक बंद झाली पाहिजे रिक्षाचालक मालकांचं कल्याणकारी मंडळ स्थापन झाले पाहिजे वाढव दंड रद्द झाला पाहिजे, मुक्त रिक्षा परवाना बंद झाला पाहिजे,
यासह इतर विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे, यासाठी आरपारची लढाई लढून सर्व संघटनांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल यासाठी रिक्षा बंद ठेवण्याचे आता तरी आवश्यकता नाहीये योग्य वेळ आल्यास सर्व संघटना मिळून  याबद्दल निर्णय घेतील, काय बागांमध्ये रिक्षाचालकांना काढून त्यांना मारहाण केली जात आहे हे निषेधार्थ असून अशा प्रकारची गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही असा इशारा यावेळी बाबा कांबळे यांनी दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.