पोलीस आयुक्तालयातील निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

0

पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील नऊ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत  बदल्या करण्यात आलेल्या आहेत. मंगळवारी रात्री उशीरा याबाबत आदेश झाले आहेत.

पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर यांची जनसंपर्क अधिकारी म्हणून निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांची मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. निरीक्षक सोन्याबापू देशमुख यांची हिंजवडी (गुन्हे) निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे.

निरीक्षक कृष्णदेव खराडे यांची वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिंचवड, निरीक्षक सतीश पवार यांची अमली पदार्थ विरोधी पथक प्रमुखपदी, निरीक्षक अजय जोगदंड यांची वाहतूक विभागात, निरीक्षक शंकर अवताडे यांची वरिष्ठ निरीक्षक पिंपरी, निरीक्षक मिलिंद वाघमारे यांची देहूरोड वाहतूक विभाग तर निरीक्षक भास्कर जाधव यांची वरिष्ठ पोलीस निरिक्षक भोसरी येथे नियुक्ती करण्यात आलेली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.