‘आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे जिल्ह्यातच होणार’

0

पुणे : आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे जिल्ह्यातच होणार, मात्र कुठं होणार ही जागा अद्याप निश्चित नाही. असे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार म्हणाले. पुण्यातील विधान भवन येथे शनिवारी आयोजित कोरोना आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी आपली भूमिका मांडली. 

आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरुवातीला खेड मध्ये प्रस्तावित होते मात्र अनेकांनी केलेल्या विरोधामुळे ते पुरंदरला हलविण्यात आले. पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नव्या बदललेल्या जागेसाठी संरक्षण मंत्रालयाने दिलेले ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (एनओसी) रद्द करण्यात आले. त्यामुळे आता विमानतळ कुठे होणार असा प्रश्न उपस्थित केला जात होता. त्यावर अजित पवार यांनी आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे जिल्ह्यातच होणार असल्याचे स्पष्ट केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘विमानतळ पुणे जिल्ह्यातच होणार, या विमानतळाला दोन धावपट्ट्या असतील. मात्र, विमानतळाची जागा आताच जाहीर करता येणार नाही; अन्यथा त्यावरून फाटे फुटतील. आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे जिल्ह्यातच व्हावे, अशी राज्य सरकारची भूमिका असून, त्यासाठी सर्व जण प्रयत्नशील आहेत,’ अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.