इंटरनॅशनल डॉन मला ओळखतात, घाबरायचं नाही : गणेश नाईक

0
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता जाहीर व्हायच्या आधीच शहरातील वातावरण चांगलेच तापलेले आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्याने ऐन थंडीत नवी मुंबईतील वातावरण तापू लागले आहे. याचदरम्यान भाजपचे नेते गणेश नाईक यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगू लागली आहे. “इंटरनॅशनल डॉन मला ओळखतात घाबरायचं नाही,” असं गणेश नाईक म्हणाले. त्याला शिवसेनेनेही उत्तर दिलं आहे. “गणेश नाईक इंटरनॅशनल डॉन असतील तर आम्ही नवी मुंबईत डॉन आहे,”

तुर्भेमधली भाजपच्या कार्यक्रमात गणेश नाईक बोलत होते. नवी मुंबई महापालिका निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसं फोडाफोडीचं राजकारण रंगलं आहे. निवडणुकीच्या आधीच शिवसेना आणि राष्ट्रवादीने भाजपचे काही नगरसेवक फोडले आहेत. या फोडाफोडीवर भाष्य करताना गणेश नाईक यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला. “कोणत्याही गुंडगिरीला घाबरु नका. रात्री अपरात्री मला कधीही फोन करा. इथलेच काय इंटरनॅशनल डॉन सुद्धा मला ओळखतात. त्यामुळे घाबरायची गरज नाही, असं गणेश नाईक यांनी जाहीर भाषणात सांगितलं.

इंटरनॅशनल डाॅन बरोबर गणेश नाईक यांचे संबंध असतील तर त्याची एस आय टी मार्फत चौकशी करावी अशी मागणी सुप्रिया सुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडे करणार असून हा प्रश्न संसदेत उपस्थित करणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.