आज इंटरनेट क्रांती झाली. दावा केला जात आहे की, ही सेवा पूर्ण क्षमतेने सुरु झाल्यानंतर इंटरनेट अधिक वेगवान होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ही सेवा आजपासून सुरु झाली.
देशातील 13 शहरांमध्ये 5G सेवा सुरु करण्यात येणार आहे. दिवाळीपर्यंत या 13 शहरांमध्ये 5G इंटरनेट सेवा सुरु होईल. त्यानंतर हळूहळू 5G इंटरनेट सेवेचं जाळं देशभर विस्तारत जाईल. मुंबई, पुणे, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू, चंदीगड, गुरुग्राम, हैदराबाद, लखनौ, गांधीनगर, अहमदाबाद आणि जामनगर या 13 शहरांमध्ये 5G सेवा सुरु होणार आहे.
आजपासून देशातील प्रमुख 13 शहरांमध्ये 5G इंटरनेट सेवा सुरू होणार आहे. यामध्ये राज्यातील दोन शहरांचा समावेश आहे. महाराष्ट्रात मुंबई आणि पुणे या दोन शहरांमध्ये 5G इंटरनेट सेवा सुरू होणार आहे. देशात 5G सेवादेखील 4G सेवेप्रमाणे टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात 13 शहरातून 5G सेवा सुरू करण्यात येईल.
सध्या भारत जागतिक अर्थव्यवस्थांच्या क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. भारत आता अमेरिका, चीन, जपान आणि जर्मनी या देशांनंतर जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणारा देश आहे. विशेष म्हणजे या आधी पाचव्या क्रमांकावर ब्रिटन होता. पुढच्या काही वर्षांमध्ये या क्रमवारीत भारत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचण्याची शक्यता आहे. यासाठी 5G इंटरनेट सेवेचा मोठा फायदा होणार असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.
5G सेवा 4G पेक्षा अनेक पटीने वेगवान गती देते. लॅग-फ्री कनेक्टिव्हिटीला समर्थन देते. कोट्यवधी कनेक्टेड डिव्हाइसेसना रिअल टाइममध्ये डेटा शेअर करण्यास सक्षम करते. 4G च्या 100 Mbps च्या तुलनेत 5G वर इंटरनेटचा वेग 10 Gbps पर्यंत पोहोचू शकतो. हे तुमच्या 5G कव्हरेजवर अवलंबून असेल आणि डाउनलोडची गती 1Gbps ते 10Gbps पर्यंत असू शकते.