पिंपरी : जमीन देण्याच्या बहाण्याने 40 लाखांची फसवणूक केल्या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हा प्रकार 2014 ते 21 मे 2021 या कालावधीत विजयनगर, काळेवाडी येथे घडला आहे.
या प्रकरणी विनोद किशनचंद मतानी (41, रा. विजयनगर, काळेवाडी) यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर आनंद अमरनाथ लोणकर (रा. स्पाइन रोड, मोशी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणकर याने चऱ्होली आणि मोशी येथील जमीन देतो, असे सांगून मतानी यांच्याकडून सुरुवातीला पाच लाखांचा धनादेश घेतला. जमीन खरेदीसाठी काही अंशी मोबदला म्हणून आणखी 35 लाख रुपये घेतले.
पैसे घेऊन आरोपीने मतानी यांना जमीन दिली नाही. मतानी यांनी पैशाची मागणी केली असता आरोपीने मारण्याची धमकी दिली. याबाबत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आनंद लोणकर याच्यावर यापूर्वीही वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. वाकड पोलीस तपास करीत आहेत.