नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) दोन नवीन संघांची घोषणा करण्यात आली आहे. पुढील वर्षीच्या हंगामात अहमदाबाद आणि लखनऊ असे दोन संघ सामील होणार आहेत. संजीव गोयंकाचा ‘आरपीएसजी समूह’ लखनऊ तर ‘सीव्हीसी कॅपिटल’ अहमदाबाद संघांचा मालक झाला आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आज सोमवारी दुबईमध्ये टीम बिडिंग प्रक्रियेनंतर या संघांची घोषणा झाली. आरपीएसजी समूहाने 7,090 कोटींची बोली लावली. आयपीएलच्या इतिहासातील ही सर्वात मोठी बोली ठरली. सीव्हीसी कॅपिटलने 5,600 कोटी रुपयांची बोली लावली.
Ahmedabad and Lucknow to be the two new teams at Indian Premier League (IPL). CVC Capital Partners gets Ahmedabad while RPSG Group gets Lucknow. pic.twitter.com/0zmQS7nQEb
— ANI (@ANI) October 25, 2021
पुढील हंगामापूर्वी डिसेंबर 2021 मध्ये या दोन संघासाठी मेगा लिलाव होणार आहे.