देशातील अहमदाबाद, बेंगलुरु, चेन्नई, दिल्ली, मुंबई आणि कोलकाता येथे हे सामने होणार आहेत. प्ले ऑफ आणि 30 मे रोजी होणारा अंतिमा सामना अहमदाबाद मधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळवले जातील. यंदाच्या आयपीएलचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे कोणताही संघ त्यांच्या घरच्या मैदानावर सामना खेळणार नाही. लीगच्या टप्प्यात सर्व संघ 6 पैकी 4 ठिकाणी खेळतील.
मुंबई : क्रिकेट रसिक आतुरतेनं वाट पाहत असलेल्या आयपीएल 2021 चं अखेर आज वेळापत्रक जाहीर झालं आहे. दोन वर्षानंतर आयपीएल भारतात परतले असून नऊ एप्रिल रोजी चेन्नईत हंगामाचा पहिला सामना खेळला जाईल. गतविजेत्या मुंबई आणि बंगळुरु संघात रंगणार पहिला सामना रंगणार आहे.