मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांबाबत बेताल वक्तव्य करणारे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याबाबत काय बोलावे. ते एका अशा पदावर आहेत, म्हणून सोडून देतो, नाहीतर महाराष्ट्रात शिव्यांची कमतरता नाही.
त्यांना पद आहे, पण कधी कुठे काय बोलावे याची कसलीच पोच त्यांना नाही. या राज्यपालांना कोण स्क्रीप्ट देते काय हे पहावे लागेल, असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोल्हापुरातील पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
सीमाप्रश्न न्यायप्रविष्ट आहे. याबाबत आज दिल्लीतही बैठका होत आहेत. सीमाप्रश्नी न्यायालय जो निर्णय देईल तो देईल. मग सीमाप्रश्न मध्येच कसा काय वर येतो, असा सवाल करत मूळ प्रश्नावरून लक्ष दुसरीकडे जावे यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत की काय हे शोधणे गरजेचे आहे, असे राज ठाकरे यांनी सांगितले. मुंबई महापालिका निवडणूक स्वतंत्रपणे लढणार. कुणाशीही युती करणार नाही, असे राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले.