छ. शिवरायांच्या वेशातील अभिमान निराळाच!

0

मुंबई ः अभिनेता अजय देवगणच्या ‘तान्हाजी : द अनसंग वाॅरियर’ या ऐतिहासिक चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजींची भूमिका साकारणारा अभिनेता शरद केळकर त्यांच्या इन्स्टाग्रामवर केलेल्या पोस्टमुळे चांगलाच चर्चेत आहे. त्याने छ. शिवरायांच्या वेशभूषेतील एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

‘तान्हाजी : द अनसंग वाॅरियर’ या ऐतिहासिक चित्रपटातील शरद केळकरचा लूक प्रेक्षकांना जास्त भावला होता. छ. शिवरायांच्या वेशातील फोटो आपल्या इन्स्टावरील अकाऊंटवर शेअर करत त्यांने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ”महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या अवतारात पहिल्यांदा येण्याचा अभिमान काही निराळाच होता.”

शरद केळकरचा हा फोटो सद्या वेगाने व्हायरल होत आहे. चाहत्यांच्या काॅमेट्स आणि लाईक्स मोठ्या प्रमाणात येत आहेत. ‘तान्हाजी : द अनसंग वाॅरियर’ या ऐतिहासिक चित्रपटाने बाॅक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. मुख्य भूमिकेत अजय देवगण आणि काजोल होती. आणि लक्षात राहणारा खलनायक हा सैफ अली खान होता.

Leave A Reply

Your email address will not be published.