मुंबई : महाराष्ट्र राज्य शास्त्रीय कर्मचाऱ्यांच्या नियमित बदला या साधारण प्रत्येक वर्षी एप्रिल ते मे या महिन्यात केल्या जातात. मात्र, यावर्षी या बदल्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्य शासनाच्या या निर्णयामागे नोटबंदी तर कारणीभूत नाही ना? असा प्रश्न विधान परिषदेची विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला आहे.
या संदर्भात अंबादास दानवे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्य सरकारच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यामध्ये त्यांनी शासन निर्णयाची प्रत देखील प्रसिद्ध केली असून दोन हजारांच्या नोटांबाबत नुकत्याच झालेला निर्णय यास कारणीभूत नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
अधिनियम 2005 मधील तरतुदीनुसार राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रत्येक वर्षी एप्रिल व मे महिन्यात सर्वसाधारण बदल्या करण्यात येतात. त्यानुसार या बदल्या करण्यात येणार होत्या. मात्र राज्य सरकारने या सर्वसाधारण बदलाबाबत 30 जून 2023 पर्यंत मुदत वाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.