पिंपरी : शेयर मार्केट सध्या गुंतवणुकीसाठी एक चांगला पर्याय म्हणून याकडे पाहिले जात आहे. याच व्यवसायात गेली 14 वर्षे ग्राहकांना सेवा देणाऱ्या निगडी येथील रुची स्टॉक मार्केटच्या शिरात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. शेयर मार्केट मध्ये काम करणाऱ्या शहरातील संस्थापैकी ISO 9001 मिळवणारी रुची स्टॉक मार्केट ही एकमेव संस्था ठरली आहे.
मागील दोन वर्षे कोरोनाचा काळ सर्वजण सामना करत आहोत. यामध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, व्यवसाय बंद पडले, काहींना अर्ध्या वेतनावर काम करावे लागले. व्यवसायातील उलाढाल कमी झाली यामुळे मोठ्या प्रमाणावर शेयर मार्केट मधील गुंतवणुकीकडे कल निर्माण झाला आहे. याकडे अनेकजण एक आशेचा किरण म्हणून पाहत आहेत.
शेयर मार्केट मधील गुंतवणूक, ट्रेडिंग आदी बाबत गुंतवणूक करण्यापूर्वी काही माहिती असणे गरजेचे आहे. याचे पुरेपूर शिक्षण असणे फार महत्वाचे आहे. हेच काम दत्तात्रय विभूते यांनी त्यांच्या रुची शेयर मार्केट मधून केले आहे. या संस्थेचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्रात होत असून सध्या 15 शाखा राज्यात आहेत.
14 वर्षाचा प्रदीर्घ अभ्यास आणि अनुभवातून कोरोना काळात ऑनलाईन प्रशिक्षण देऊन अनेकांना चांगला परतावा मिळवून दिलेला आहे. तज्ञ प्रशिक्षण प्रणाली यामुळे सुमारे 10 हजार हुन अधिक विद्यार्थी शिक्षण घेऊन स्वतः ट्रेडिंग करत आहेत. या सर्व बाबींवरुन रुची शेयर मार्केट संस्थेला ISO 9001: 2015 मिळाले आहे.