मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी नाराज मनाने उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यासारखं वाटत असे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची आणि फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यानंतर शिंदे सरकारबाबत पहिली प्रतिक्रिया शरद पवार यांनी नोंदविली.
एक स्थानिक बाब आहे, आत्ताचे मुख्यमंत्री आडते ते मुळ सातारचे आहेत. योगायोग असा की राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण सातारचे होते. मी पण मुळ कोरेगाव तालुक्याचा होतो. बाबासाहेब भोसले, पृथ्वीराज चव्हाण आणि आत्ता ज्यांनी शपथ घेतली ते सातारचे आहेत, असं म्हणत शरद पवार यांनी शिंदे यांच्या सातारा कनेक्शनचा उल्लेख केला.
मी एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवर बोललो,त्यांना शुभेच्छा दिल्या. राज्याचा प्रमुख झाल्यावर तो राज्याचा प्रतिनिधी होतो. राज्याचे सर्व विभागातील लोकांचे प्रश्न सोडविण्याची कामगिरी त्यांच्याकडून व्हावी, असे मत पवार यांनी बोलून दाखविले.