पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना सोशल मीडियावरून धमकी देणाऱ्या एका आरोपीला मुंबई गुन्हे शाखेच्या पथकानंरविवारी अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर बर्वे ( 34) असं पवारांना धमकी देणाऱ्या आरोपीचं नाव आहे. या आरोपीला पुण्यातून अटककरण्यात आली आहे. आरोपी सागर बर्वे हा आयटी इंजिनीअर आहे. अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याला स्थानिक न्यायालयात हजरकेलं आहे. याप्रकरणी आरोपीला स्थानिक न्यायालयानं 13 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना धमकी दिल्याप्रकरणी पुण्यातून एकाला अटक करण्यात आली आहे. मुंबई गुन्हे शाखेनंयासंदर्भात कारवाई केली. स्थानिक न्यायालयाकडून 13 जूनपर्यंत आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणातलोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात मुंबई गुन्हे शाखेनं गुन्हा दाखल केल्यानंतर पुढील तपास करत विविध पथकं तयार करण्यातआली होती. अखेर पवारांना धमकी देणाऱ्याला बेड्या ठोकण्यात मुंबई गुन्हे शाखेला यश आलं. दरम्यान, आरोपीची कसून चौकशी सुरूअसून आरोपीनं हे पाऊल का उचललं याचा शोध मात्र सुरू आहेत.
शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर राज्यभरात राष्ट्रवादी आक्रमक झाली होती. त्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार आणिशरद पवार यांच्या कन्या सुप्रीया सुळे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली. शरद पवारांनाजीवे मारण्याची धमकी देणाऱ्या ट्विटर हँडलवर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनीतात्काळ दखल घेत तपास सुरू केला. अखेर आरोपीला बेड्या ठोकण्यात गुन्हे शाखेला यश आलं आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठीपोलिसांनी काही तांत्रिक बाबींचा आधार घेतला. आरोपी सागर बर्वे माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असून त्यानंच दोन्ही अकाउंटतयार केल्याचा पोलिसांना संशय आहे.
दरम्यान, राजकारण महाराष्ट्राचे या फेसबुक अकाउंटवर ‘नर्मदाबाई पटवर्धन‘ या नावानं एक अकाउंट आहे. त्यावर असलेल्या पोस्टमध्येशरद पवार यांना उद्देशून ‘तुझा लवकरच दाभोलकर होणार‘, अशी धमकी देण्यात आली होती. तर सौरभ पिंपळकर नावाच्या ट्विटरहँडलवरुन शरद पवार यांची औरंगजेबासोबत तुलना करत आक्षेपार्ह भाषेचा वापर केलेला मजकूर प्रसिद्ध करण्यात आला होता.