“आय.टि.हब” मुळे रिक्षा व्यवसायास चालना मिळेल : विक्रम साखरे

0

हिंजवडी : आय.टि.आय कंपनीमुळे हिंजवडी परिसर देशाच्या नकाशावर आय. टि.हब म्हणून पुढे आला आहे, या परिसरात रिक्षा चालक मालकांना, व्यवसायाची संधी निर्माण झाली आहे, या संधीने रिक्षा व्यवसायास चालना मिळेल असे मत हिंजवडी चे सरपंच विक्रम साखरे यांनी व्यक्त केले आहे, हिंजवडी ग्रामपंचायत समोर महाराष्ट्र रिक्षा पंचायत सलंग्न श्री म्हातोबा रिक्षा संघटक स्टँड चे उद्घाटन करण्यात आले, यावेळी ते बोलत होते,

पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांच्या हस्ते रिक्षा स्टँड चे उद्घाटन करण्यात आले, यावेळी माजी सरपंच श्यामराव उलावळे, पंचायत शहराध्यक्ष सोमनाथ कलाटे, विभाग अध्यक्ष भागवत मामा उजणे, रिक्षा ब्रिगेडचे जाफर भाई शेख, अनिल शिरसाठ आदी उपस्थित होते,

बाबा कांबळे म्हणाले या परिसरात रिक्षाचालकांनी व्यवस्थित सेवा दिल्यास तसेच या भागातील आय.टी.कंपनीशी चांगले संपर्क केल्यास रिक्षा व्यवसाय मध्ये वाढ होईल आयटी क्षेत्राबरोबर रिक्षा व्यवसाय देखील वाढला पाहिजे यात संघटना देखील तुमच्या पाठीशी उभी राहील असे, मत बाबा कांबळे यांनी व्यक्त केले,

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी रिक्षा स्टॅन्ड अध्यक्ष संभाजी साखरे उपाध्यक्ष श्रीकांत भिलारे, किशोर मोरे, प्रकाश शेळके, बाळासाहेब कुंजीर, सुहास लांडगे, काळूराम मातेरे, रामदास जांभूळकर, केतन भिलारे, संतोष हरगुडे, संजय कदम, नितीन, बाळासाहेब शिंदे यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.