पुणे : कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर हे पुन्हा एकदा वादात अडकले असून, कोरोनाची तिसरी लाट माळा काढणाऱ्यांसाठीचअसल्याचं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केल आहे. यावर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे डॉ. हमीद दाभोलकर यांनी प्रतिक्रिया दिलीय. वारकरी संप्रदायाच्या नावावरती कोरोनाविषयी असे गैरसमज पसरवणे चुकीचं आहे, असं मत हमीद दाभोलकर यांनी व्यक्त केलं.
इंदुरीकर महाराज म्हणाले होते, “दीड वर्ष काय लक्षात कुठे राहिलंय? ८० टक्के भजनं, हरिपाठ विसरले. ४० टक्के किर्तनकारच हरिपाठविसरले. उत्पन्नच नाही तर हरिपाठ करुन काय करायचं? ४० टक्के माळकऱ्यांनी माळा काढल्या. अंडे खाल्यावर करोना होत नाहीकोणीतरी सांगितलं आणि वांगी सोडून अंडी खायला लागले. टीव्हीला माळकऱ्यांना पाच हजार मिळणार असल्याची बातमी आलीआणि पुन्हा माळ घातली. पण तिसरी लाट ही फक्त माळा काढणाऱ्यांसाठीच असणार.” यावेळी त्यांनी मन खंबीर ठेवणं हेचकरोनावरील औषध असल्याचं म्हटलं होतं.
डॉ. हमीद दाभोलकर म्हणाले, “इंदुरीकर महाराज यांनी ‘माळा काढणाऱ्यांसाठीच तिसरी लाट असणार आहे’ अशा स्वरुपाचं वक्तव्यकेलं आहे. माझ्यामते ते अशास्त्रीय विधान आहे. करोना कशामुळे होतो आणि तो टाळण्यासाठी काय करायला पाहिजे यासाठी शासनआपल्याला परत परत वेगवेगळ्या माध्यमातून माहिती देतंय. करोना हा एक विषाणूजन्य आजार आहे. त्याच्यापासून प्रतिबंध करायचाअसेल तर आपण सर्वांनी लस घेणं गरजेचं आहे.”
“शासनाने आता बुस्टर डोस घेण्यास सांगितलं आहे. तो डोस घेणं देखील आवश्यक आहे. करोनाविषयी असे गैरसमज पसरवणं आणिते देखील वारकरी संप्रदायाच्या नावावरती हे चुकीचं आहे. तुकाराम महाराजांनी ३५० वर्षांपूर्वी आपल्याला कार्यकारणभाव सांगितलाहोता. ‘नवसा सायासे कन्यापुत्र होती, तर का करणे लागे पती’, असं जी वारकरी परंपरा सांगते तिच्या नावावर अशाप्रकारच्या अंधश्रद्धापसरवणे ही चुकीची गोष्ट आहे,” असं मत हमीद दाभोलकर यांनी व्यक्त केलं.