मुंबई : ‘मी आर्यन खान सोबत धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकत होती. तसेच आर्यनची बहीण सुहाना खानची सुद्धाजवळची मैत्रीण आहे. ज्यामुळे आर्यन खान आणि सुहाना आम्ही फॅमिली फ्रेंड आहोत. शूटिंग मधून जेव्हा वेळ मिळतो तेव्हा आम्हीसगळे भेटतो त्यामध्ये आमच्या शाळेतील मित्र सुद्धा असतात.’
वीड संदर्भात जेव्हा अनन्या पांडे ला विचारण्यात आलं तेव्हा तिने आपण कुठल्याही प्रकारची ड्रग्स घेत नाही. तसेच कधी सप्लायही केलंनसल्याचं एनसीबीला सांगितले. वीड संदर्भात झालेल्या चॅट बद्दल अनन्या ने एनसीबी ला सांगितलं की, ‘त्या वेळेला सिगरेटआनन्यावरून हे चॅट झाले होते. मात्र खूप वर्षांपूर्वीचे चॅट असल्यामुळे नीट आठवत नाही मात्र वीड हे एका प्रकारचे ड्रग्स आहे हे मलामाहिती नाही.’
अनन्या पांडे ही एनसीबी कार्यालयात आली तेव्हा तिच्या सोबत तिचे वडील चंकी पांडे सुद्धा होते चंकी पांडे यांना बाहेर बसवण्यात आलेआणि अनन्या पांडेची चौकशी विश्व विजय सिंग,समीर वानखेडे आणि एक महिला अधिकारी या तिघांनी केली.
2018-19 मधील आर्यन खानसोबत झालेल्या चॅटमुळे अनन्या पांडे एनसीबीच्या चौकशीच्या भोवर्यात आली आहे. दोन वेळाआर्यनसोबत वीड सप्लायबद्दल झालेल्या चॅटमध्ये अनन्या पांडेचे नावं समोर आले. अनन्या पांडेचे दोन फोन एनसीबी ने जप्त केलेआहेत, एव्हीडेन्स टेम्परिंग होऊ नये म्हणून अनन्या पांडेचा एक जुना फोन आणि आता नवीन घेतलेला फोन जप्त केला आहे. ड्रग्स सेवनकेल्यास संदर्भातील सुद्धा एनसीबी अनन्या पांडेला प्रश्न विचारनार असून अनन्या प्रश्नांची उत्तरे देण्यात असमर्थता दाखवत होती.