पिंपरी : वेगवेगळ्या क्षेत्रातून महिलांना मार्गदर्शन आणि शिक्षण देणाऱ्या रुपाली जाधव यांना गोल्डन स्टार पुरस्काराने गौरविण्यात आले.
महिला दिनाचे औचित्य साधून दिघी येथील आर्यांस स्टार फॅशन स्टुडिओ यांच्या वतीने समाजातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मानकरण्यात आला. यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला.
रुपाली जाधव यांनाही गोल्डन स्टार पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली.