छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार ब्रिटनमधून महाराष्ट्रात आणणार : मुनगंटीवार

0

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांची जगदंबा तलवार ब्रिटनमधून परत महाराष्ट्रात आणली जाईल, अशी घोषणाच सांस्कतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज केली. केंद्र सरकारच्या माध्यमातून पाठपूरावा करुन ही तलवार परत आणू असेही त्यांनी आज माध्यमाशी बोलताना स्पष्ट केले.

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, 2024 पर्यंत जगदंबा तलवार महाराष्ट्रात आणण्याचे आमचे प्रयत्न आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे पंतप्रधान झाले आहेत, त्यामुळे केंद्र सरकारला आम्ही विनंती केली आहे. शिवराज्यभिषेकाला साधारणतः 2024 मध्ये साडेतीनशे वर्ष पूर्ण होत आहेत. यामुळे विभागाच्या माध्यमातून आम्ही कार्यक्रम आखत आहोत. ब्रिटनने तलवार दिली तर आम्हाला आनंद आहे.

शिवरायांच्या विजयाच्या घौडदौडीची साक्षीदार आणि लढाईत शत्रूला पाणी पाजणारी जगदंबा तलवार महाराष्ट्रात यायला हवी. कारण ती शिवरायांच्या पराक्रमाचीही साक्षीदार आहे. इंग्लडचे प्रिन्स जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांना ही तलवार भेट म्हणून दिल्याची नोंद आहे. 1875-76 साली ही तलवार भारतातून इग्लंडला गेली, त्यामुळे ती तलवार आपल्याकडे यायला हवी ही मागणी महाराष्ट्राची आहे.

ऋषी सुनक सध्या ब्रिटनचे पंतप्रधान असून त्यांच्या माध्यमातून ही तलवार भारतात आणि महाराष्ट्रात आल्यास हे वैभव आपल्याकडे असेल आणि त्यामुळे आपल्या पराक्रमी इतिहासाची आपल्याकडे साक्ष राहील.

कोल्हापूरचे शिल्लेखाना येथे जी तलवार होते त्यावर जगदंबा हे नाव लिहीलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दोन तलवारी प्रसिद्ध आहेत. एक अर्थातच त्यांची भवानी तलवार आणि दुसरी जगदंबा तलवार होती. यातील जगदंबा तलवार ब्रिटनच्या राणीच्या संग्रही असल्याचे समोर आले आहे.

शिवरायांच्या पराक्रमाने गौरवांकित झालेली जगदंबा तलवार सध्या ब्रिटनच्या राणीच्या संग्रहालयात आहे. 1875 मध्ये तत्कालीन ब्रिटिश युवराज प्रिन्स ऑफ वेल्स भारत भेटीवर आला होता. त्याने भारतातील अनेक नामचीन शस्त्र घेऊन गेला. त्यातच प्रेमाची सक्ती म्हणून जबरदस्तीचे प्रेझेंट तो करवीर छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांच्याकडून घेऊन गेला.

Leave A Reply

Your email address will not be published.