जय हनुमान ग्रामविकास पॅनलच्या ‘बाईक रॅली’ला सुरुवात

0

हिंजवडी : हिंजवडी आयटी पार्कला लागून असणाऱ्या मारुंजी गावाच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आज बुधवारी जय हनुमान ग्रामविकास पॅनलकडून बाईक रॅलीचे नियोजन केले आहे. या रॅलीला सुरुवात झाली असून मोठी गर्दी आहे.

मारुंजी गावाच्या निवडणुकीच्या रिंगणात जय हनुमान ग्रामविकास पॅनलकडून सुशिक्षित आणि तरुण उमेदवार अर्जुन बाबुराव बुचडे, कावेरी संदीप बुचडे, दत्तात्रय तुकाराम सुतार उभा आहेत. 15 जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानाचा आज शेवटचा दिवस प्रचाराचा आहे. त्यामुळे आज शक्ती प्रदर्शन दाखविण्यात येत आहे.

गावच्या विकासासाठी निवडणुकीच्या रिंगणात उभा असणाऱ्या जय हनुमान पॅनलच्या अर्जुन बाबुराव बुचडे, कावेरी संदीप बुचडे, दत्तात्रय तुकाराम सुतार आणि इतर उमेदवारांसाठी मारुंजी सर्व वार्डात बाईक रॅली काढण्यात येणार आहे.

मोठ्या गर्दीने आणि उत्साहात आज सकाळी रॅलीला सुरुवात झाली आहे. तरुण, वृद्ध यासह महिलाही या रॅलीत सहभागी झालेल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.