पिंपरी : केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशात महागाई व इंधन दर वाढत असल्याच्या निषेधार्थ आज काँग्रेसचं महागाई आणि बेरोजगारीविरोधात देशव्यापी आंदोलन आहे. त्याअनुशंगाने पिंपरी चिंचवड शहरातही काँग्रेसचे जेलभरो आंदोलन करण्यात आले. पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात हे आंदोलन केले गेले. हे आंदोलन पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे.
केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशात महागाई व इंधन दर वाढत असल्याच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसचे जेल भरो आंदोलन पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात करण्यात आले. हे आंदोलन पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे. यावेळी केंद्र सरकारच्या, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह मंत्री अमित शाह व भारतीय जनता पार्टी यांच्या विरोधात घोषणाबाजीकरण्यात आली. त्यानंतर शहर काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
केंद्र सरकारची टीका करताना कदम म्हणाले की महागाई, इंधन दरवाढ, जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी यामुळे सामान्य माणसाचे जगणे कठीण झाले आहे. आम्हाला रडणारा प्रधान मंत्री नको तर काम करणारा प्रधान मंत्री आहे. भारतीय जनता पार्टी ने प्रत्येकाच्या बँक खात्यात 15 लाख रुपये देणार, प्रत्येक वर्षी 2 कोटी नोकऱ्या देणार अशी मोठी आश्वासने देऊन 2014 च्या निवडणुकामध्ये सट्टा मिळवला. पण ही आश्वासने आज पर्यंत पुर्ण केली गेली नाहीत.
समाज सेवक मानव कांबळे म्हणाले की भारत हा जगातला पहिला देश आहे जेथे शिक्षणासाठी उपयोगी असलेली व्ह्या, पुस्तके व इतर वस्तूंवर जीएसटी लावला आहे. एकीकडे केंद्र सरकार म्हणते स्कूल चले हम व दुसरीकडे शिक्षणासाठी उपयोगी वस्तूंचे दर वाढवत आहें त्यामुळे गरिबांच्या मुलांनी शिक्षण कसे घ्यायचे? ते पुढे म्हणाले की 2014 निवडणुकी वेळेस एका डॉलर ची किंमत 62 रुपये होती तेव्हा मोदी म्हणाले की ज्या देशाचे चलन डॉलर च्या तुलनेत घसरते त्याप्रमाणे देशाची घसरण होते. आत्ता मोदींच्या राज्यात एका डॉलरची किंमत 82 रुपये झाली आहे तर देशाची घसरण झाली नाही का? रुपया घसरल्याने अमेरिकेत उच्च शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या मुलांच्या फी मध्ये 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
यावेळी केंद्र सरकारच्या, प्रधान मंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह मंत्री अमित शाह व भारतीय जनता पार्टी यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर शहर काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.