कूविख्यात गजानन मारणेची महामार्गावरून जंगी मिरवणूक

0
पिंपरी : कूविख्यात गजानन मारणे याची 2 खुनातून निर्देश मुक्तता झाल्यानंतर त्याची तळोजा कारागृहातून सुटका झाली. यानंतर महाराष्ट्राचा ‘किंग’ असे स्टेटस टाकत चाहत्यांनी त्याची मुंबई-पुणे महामार्गावरून जंगी मिरवणूक काढली. पुण्यात त्याने ‘रॉयल इंट्री’ तर केलीच पण त्याच्या या गाड्यांचा ताफा पाहून चांगलीच खळबळ उडाली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे.

एकीकडे ‘मोहोळ’ने जेलबाहेर पडल्यानंतर शहरात एका कार्यक्रमाला आणि इतर ठिकाणी हजेरी लावत ताकत दाखवली आणि दुसरीकडे गजानन मारणे याने इंट्रीच रॉयल केल्याने पोलिसांच्या डोकेदुखीत वाढणार होणार आहे.

तळोजा कारागृह ते पुणे यादरम्यान शक्तीप्रदर्शन करत मारणे याच्या साथीदारांनी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वाहनांच्या रांगा लावल्या होत्या. त्याचदरम्यान, द्रुतगती मार्गावरील उर्से टोल नाका येथे फूड मॉलजवळ मारणे याच्यासह सर्व कार्यकर्ते थांबले होते. त्यांनी आरडाओरडा करत बेकायदेशीर गर्दी जमवून फटाके वाजवले. तसंच, ड्रोनने चित्रीकरण करत दहशतीचं वातावरण निर्मिती केल्याने मारणे याच्यासह त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गजानन मारणे आणि त्याच्या टोळीतील सदस्यांची नुकतीच पप्पू गावडे आणि अमोल बधे या दोन खुन प्रकरणात न्यायालयाने काही दिवसांपूर्वी निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायालयाने सबळ पुरावा नसल्याने मुक्तता केली आहे.

शहरात कधी काळी या टोळ्यांची मोठी दहशत होती. गेले काही वर्षे या टोळ्यांचे प्रमुख वेगवेगळ्या गुन्ह्यात कारागृहात होते. त्यांच्यावर मोक्कानुसार कारवाई करत पोलिसांनी मुस्कट दाबी केली होती. पण आता बहुतांश टोळीचे प्रमुख आणि त्यांचे सदस्य बाहेर आले आहेत.

एकीकडे पोलीस खुना सारख्या गुन्ह्यात मोक्का लावतात व 3 वर्ष कारागृहात बसवतात. पण याच गुन्ह्यात त्यांची निर्दोष सुटका झाली आहे. त्यामुळे गुन्हेगार देखील आता मोक्का सारख्या कारवाईला जुमानत नसल्याचे दिसत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.